कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकासाची नवी लाट – मंत्री छगन भुजबळ

‘नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ’ प्रदर्शनात भविष्यातील शहराची झलक

0

नाशिक, दि. १५ ऑगस्ट 2025 CREDAI Nashik Metro exhibition आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकासकामांचा मोठा धडाका लागणार आहे. रिंग रोड, रस्त्यांचे विस्तारीकरण, हवाई व रेल्वे सुविधा सुधारणा, तसेच पायाभूत प्रकल्पांमध्ये भरीव गुंतवणूक करून नाशिकला जागतिक पातळीवर आणण्याची तयारी सुरू आहे. या सर्व विकासयोजनांचा आढावा आणि शहरातील मालमत्ता क्षेत्रातील संधी दाखवणारे ‘नम: नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन ठक्कर डोम येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले.

क्रेडाईचे मोलाचे योगदान(CREDAI Nashik Metro exhibition)

कार्यक्रमात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी शहराचा विकास हा पर्यावरणाशी सुसंगत असावा, तसेच गोदावरी स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. गिरीश महाजन यांनी नाशिकचे धार्मिक, ऐतिहासिक, औद्योगिक आणि शैक्षणिक महत्त्व अधोरेखित करत, कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले.

क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी आपल्या भाषणात नाशिकची वाटचाल ‘ग्लोबल सिटी’कडे होत असल्याचे सांगितले. “उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि संस्कृती या चतु:सूत्रीवर आधारित भविष्यातील नाशिक घडवण्याचा मानस आहे,” असे ते म्हणाले.

भविष्यातील नाशिक संधी आणि गुंतवणुकीचे केंद्र

समन्वयक नरेंद्र कुलकर्णी यांनी भविष्यात नाशिकमध्ये उपलब्ध होणाऱ्या गुंतवणुकीच्या संधींचा सविस्तर उहापोह केला. यात महिंद्राची मोठी गुंतवणूक, डिफेन्स हब, प्रस्तावित आयटी हब, दिंडोरी औद्योगिक क्षेत्रातील रिलायन्स लाइफ सायन्सेससारखे प्रकल्प, मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क, इंडियन ऑइलचा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प, वाईन व कृषी पर्यटन, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तसेच कुंभमेळ्यासाठी शासनाकडून होणारी पायाभूत गुंतवणूक यांचा समावेश आहे.

समन्वयक ऋषिकेश कोते यांनी नाशिकच्या वाढत्या कनेक्टिव्हिटीची माहिती दिली

प्रस्तावित दिल्लीमुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर

प्रस्तावित नाशिकपुणे हायस्पीड रेल्वे

पूर्णत्वास गेलेला समृद्धी महामार्ग (नाशिकमध्ये तीन प्रवेशद्वारे)

प्रस्तावित चेन्नईसुरत एक्सप्रेसवे

नाशिकवाढवण बंदर रस्ता

लोकल रेल्वेद्वारे नाशिकमुंबई जोडणी

प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये

हे प्रदर्शन 18 ऑगस्टपर्यंत चालणार असून पूर्ण वातानुकूलित डोम, प्रशस्त पार्किंग, विविध ऑफर्ससह 500 हून अधिक प्रॉपर्टी पर्याय, तसेच ‘ग्रीन कुंभ 2025’ या संकल्पनेअंतर्गत विविध तज्ञांच्या विशेष चर्चासत्रांनी सजले आहे.

चर्चासत्रांचे वेळापत्रक

15 ऑगस्ट स्मार्ट सिटी-स्मार्ट कुंभ

हरित जीवनशैली व उज्वल भविष्य (गुरमीत सिंग अरोरा)

भविष्यातील स्मार्ट व पर्यावरणपूरक शहरे (डॉ. अंशुल गुजराती)

16 ऑगस्ट शाश्वत शहर, शाश्वत कुंभ

पर्यावरणपूरक व हरित विकास संकल्पना व डिजिटल प्रशासन (शेखर सिंग, आयएएस)

स्मार्ट व शाश्वत पायाभूत सुविधा आणि संस्कृतीचा समतोल (राकेश भाटिया)

18 ऑगस्ट पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी संवेदनशील नियोजन

स्वच्छ हवा, पाणी व जमिनीच्या संवर्धनासाठी सुयोग्य पर्याय (अजित गोखले)

नेट झिरो इमारतींची संकल्पना (ममता रावत)

नाशिक उद्याचे गुंतवणूक गंतव्य

या प्रदर्शनातून केवळ बांधकाम प्रकल्पांची माहितीच नाही तर भविष्यातील नाशिकची प्रगती आणि संधींची झलक नागरिकांना मिळत आहे. वाढती कनेक्टिव्हिटी, कुंभमेळ्याची तयारी, आणि पायाभूत सुविधा विकासामुळे नाशिकमध्ये रिअल इस्टेट, पर्यटन, उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी सुवर्णसंधी निर्माण होत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!