पवार तबला अकादमीतर्फे आज गुरुपौर्णिमा उत्सव

गुरुपौर्णिमा उत्सवात २५० विद्यार्थ्यांचे तबला सहवादन

0

नाशिक, दि. १९ ऑगस्ट २०२५ Nashik cultural Events नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेत तबल्याचे विशेष स्थान आहे. तालवादनकलेच्या या अखंड परंपरेचा वारसा जपणाऱ्या पवार तबला अकादमीतर्फे आज एक भव्यआज गुरुपौर्णिमा उत्सवमहाकवी कालिदास कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे . तबला व भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात गेल्या ५५ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या या संस्थेने गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘गुरुंच्या चरणी अर्पण’ या भावनेने तबला सहवादनाचा अद्वितीय कार्यक्रम सादर होणार आहे 

या कार्यक्रमात सुमारे २५० विद्यार्थी तबल्यावर एकाचवेळी विविध तालांचा संगम घडवत रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.  यामध्ये अकादमीच्या नाशिक शहरातील कानडे मारुती लेन, इंदिरानगर, गोविंदनगर, पंपिंग स्टेशन, कॉलेज रोड, पंचवटी, मेरी, सावरकर नगर, नाशिकरोड तसेच सटाणा येथील शाखांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत 

प्रमुख अतिथींची उपस्थिती(Nashik cultural Events)

उत्सवाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना विद्याहरी देशपांडे तसेच सहकार उपनिबंधक संजय गीते हे उपस्थित रहाणार आहेत.

तालांचा संगम व फ्युजनची मैफल

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्रिताल, झपताल, रूपक, मत्त, एकताल, पंचम सवारी अशा विविध तालांमध्ये तबला सहवादन सादर करणार असून यामध्ये पारंपरिक शास्त्रीय बाजूसोबतच आधुनिक स्पर्श देणारे फ्युजन सादरीकरण विशेष आकर्षण ठरणार आहे.  

शैक्षणिक संस्थांचा सहभाग

या कार्यक्रमात विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल तसेच के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, नाशिक येथील विद्यार्थ्यांचाही सहभागघेणार असून  तरुण कलाकारांनी आपल्या दमदार प्रस्तुतीतून नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे. 

साथसंगत व निवेदन

तबला वादनाला अधिक सुरेलता देण्यासाठी आशुतोष इप्पर व मल्हार चिटणीस यांनी संवादिनीवर साथसंगत करणार असून  कार्यक्रमाचे निवेदन सुनेत्रा मांडगवणे या करणारा आहेत  ध्वनी नियंत्रण सचिन तिडके व ग्राफिक्सची मांडणी मिथिलेश मांडवगणे हे सांभाळणार आहेत 

सर्वांसाठी खुला कार्यक्रम

पवार तबला अकादमीच्या वतीने हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला ठेवण्यात आला असून नाशिककर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गुरुपौर्णिमा उत्सवाचा मनमुराद आनंद घ्यावा  तबल्याच्या गजरात रसिकांना भारतीय संगीत परंपरेचे अनोखे दर्शन घडणार आहे. पवार तबला अकादमीने मागील अर्धशतकाहून अधिक काळ तबला शिक्षण व प्रसाराचे कार्य करत नाशिकला ‘तालवादनाची भूमी’ म्हणून लौकिक मिळवून दिला आहे. या परंपरेचा हा गौरवशाली सोहळा रंगणार आहे. 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!