ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद शुक्ल प्रतिपदा/ द्वितीया. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – पूर्वा फाल्गुना.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.
Marathi Rashi Bhavishya
२४ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. उच्च पदस्थ लोकांकडून मदत कशी मिळवायची हे तुम्हाला चांगले जमते. तुमचा विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो. त्यानंतर भाग्योदय होतो. आपल्या भवती सुंदर आणि चांगल्या गोष्टी सदैव असाव्यात असे तुम्हाला वाटते. खाजगी जीवनात आणि सामाजिक जीवनात तुम्ही अंतर राखतात. शिकणे आणि शिकवणे यांची आवड असते. तुम्ही जबाबदारीच्या जागा पेलू शकतात. तुम्ही अति महत्वाकांक्षा बाळगणारे आहात. गूढ विद्यांची आवड आहे. शांत दिसतात पण आतून अस्वस्थ असतात. धडपड्या आणि बढाईखोर स्वभाव आहे. घर, बायको, संसार याबाबत अत्यंत हळवे आणि संवेदनशील आहात. भाषणे, लेखन, श्रुतिका यात यश मिळते. विनाकारण काळजी करणे तुम्ही सोडून दिले पाहिजे. तुम्ही प्रेमळ आहात तसेच कलाकार आणि कला प्रिय देखील आहात. तुमच्या वागण्यात, बोलण्यात एक प्रकारचा आकर्षकपणा आणि मोहक पण आहे. इतरांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटते. रूढी परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना जरा वेगळा असून इतरांना त्या लवकर समजत नाहीत. तुमची वृत्ती खर्चिक आहे. तुमच्या आयुष्य आरामदायक, श्रीमंत, आनंदात जाते. इतरांच्या आदरास तुम्ही पात्र असतात. तुमचे मन विशाल आहे. व्यवसायामध्ये तुम्ही उच्च पदावर जातात. सिनेमा नाटक यांचे तुम्हाला आवड आहे. तुम्हाला जर मान सन्मान मिळाला तर तुम्ही खुश होतात आणि अधिक चांगले नेतृत्व करतात. इतरांनी कौतुक न केल्यास तुमचा विरस होतो. तुम्ही अत्यंत अभ्यासू वृत्तीचे आहात. वृत्तीने तुम्ही गंभीर असतात आणि तुमचा मित्रपरिवार फार जास्त नसतो. आयुष्यात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. तुम्ही उत्साही आणि महत्त्वाकांक्षा असून तुमच्या कामात सातत्य आहे. अहंगंड आणि इतरांवर स्वतःची मते लादणे टाळावे.
व्यवसाय:- गृह सजावट. दागिने विक्री, संगीतज्ञ, हॉटेल मॅनेजर, मिठाईचा व्यवसाय, जमीन खरेदी विक्री, तयार कपडे, कॉस्मेटिक्स, सुवासिक अत्तरे.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
शुभ रत्न:- पाचू, मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. नात्यातून अनपेक्षित लाभ होतील. ज्येष्ठ व्यक्तीचा मान ठेवला पाहिजे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. नेहमीपेक्षा वेगळा विचार कराल. व्यावहारिक चर्चा करतांना स्वतःच्या ताकदीचे भान ठेवावे लागेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तृतीय स्थानी चंद्र आहे. तुमच्या राशीतील गुरुशी लाभ योग आहे. सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. शेतीतून लाभ होतील. मन आनंदी राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. अचानक लाभ होतील. वारसा हक्काने संपत्ती मिळेल. लॉटरी मधून लाभ होऊ शकतात. सिद्ध व्यक्तीचे सान्निध्य लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. नोकरीत उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाल. स्वप्ने साकार होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. व्यवसाय वाढेल. नवीन संधी चालून येतील. मन काहीसे अस्वस्थ आणि साशंक राहू शकते. प्रवास शक्यतो टाळावेत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. धाडस कराल. आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. अपघाताचे भय आहे. वाहन जपून चालवा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमचा दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आर्थिक भरभराट होईल. बाधित जागी जाणे कटाक्षाने टाळले पाहिजे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक यश मिळेल. शब्दास मान मिळेल. धर्म कार्य कराल. दिवस उत्साहाने भरलेला असेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र ग्रहमान आहे. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल. गुंतवणुकीतून लाभ होतील. मात्र चुकीच्या व्यक्तीकडे आपली गुपिते उघड करू नका.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पुढील आठवड्यातील कामाचे नियोजन आजच करा. प्रगतीच्या संधी मिळणार आहेत. प्रवास घडतील. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र ग्रहमान आहे. कामातून प्रगती होईल. जमीन व्यवहाराची बोलणी होईल. शत्रू पराभूत होतील. प्रवासाचे नियोजन चुकेल. हातून काही चूक होऊ शकतात. योग्य सल्ला घ्या.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य रविवार, २४ ऑगस्ट २०२५… […]