आजचे राशिभविष्य बुधवार,२७ ऑगस्ट २०२५

२७ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

भाद्रपद शुक्ल चतुर्थी/पंचमी. शके १९४७. संवत २०८१. विश्वावसुनाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

आज आनंदी दिवस आहे” *श्री. गणेश चतुर्थी* पार्थिव गणेश पूजन.

चंद्रनक्षत्र – चित्रा.

आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या/ (संध्याकाळी ७.२१ नंतर) तुळ. (विष्टी करण शांती)

२७ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)

तुमच्यावर मंगळ रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. आध्यत्मिक स्वभाव असतो. इतरांची दुःखे दूर करावीत असे तुम्हाला वाटत असते. भिन्न लिंगी व्यक्तींबद्दल अधिक आकर्षण असते. तुम्ही स्वबीमनी आणि निग्रही आहात. आत्मविश्वास भरपूर असतो. दुरबलना मदत करणे आवडते. भावनाप्रधान, अनाकलनीय आणि लहरी स्वभाव आहे. दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे आवडत नाही. स्वतःच्या विचरांबद्दल आग्रही असतात. तुमच्यात जबरदस्त इश्चशक्ती आणि करारीपणा आहे. तुम्ही निर्णभय आहात. धैर्यवान आहात. इतरांवर हुकूमत गाजवणे तुम्हाला आवडते. तुम्ही सुदृढ आहात. विकारणावर मात करता आली पाहिजे. त्यासाठी ध्यान धारणा आवश्यक आहे. तुमचं स्मरण शक्ती चांगली आहे. तुम्ही कष्टाळू, हुशार आणि योग्य निर्णय घेणारे आहेत. तुम्हाला वारसा हक्काने इस्टेट आणि कला मिळतात. भूतकाळातील चुकांमधून आणि अनुभवातून तुम्ही शिकतात. वैवाहिक जीवनातील समस्यांचा तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. तुम्ही आक्रमक, लढाऊ आणि धाडसी आहात. ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. सहसा तुमचा कधीही पराभव होत नाही. मिल्ट्री, पोलीस याच्यात तुम्ही उत्तम चमक दाखवू शकतात. तुम्ही स्पष्ट वक्ते आहात मात्र शब्द जपून वापर

व्यवसाय:- पोलीस, मिलिटरी, गुप्तहेर, राजकीय क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, राजकीय लेखन, पत्रकार, फायर ब्रिगेड.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.

शुभ रंग:- पांढरा, पिवळा, तांबडा.

शुभ रत्न:- पुष्कराज, मोती आणि माणिक.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुधाशी शुभ लाभ योग आहे. धाडसी निर्णय घ्याल. सन्मान मिळतील. कोर्टात यश प्राप्ती होईल. शत्रू पराभूत होतील. वाहन दुरुस्ती करावी लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. संपत्ती वाढेल. कठोर बोलणे होईल. कामात काही बदल घडतील. मोठे प्रवास घडतील. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस आहे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. अध्यात्मिक लाभ होतील. सत्संग घडेल. अधिकाराचा योग्य वापर कराल. वक्तृत्व चमकेल. बुद्धीचातुर्य कामास येईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) गृह सजावट कराल. धन संपत्ती वाढेल. शेतीतून लाभ होतील. वाणिज्य व्यावसायिकांना चांगला दिवस आहे. तुमच्यातील शिक्षक आज सुखावेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल. शत्रू त्रास कमी होईल. पूर्वग्रह बाजूला ठेवून कामे करावीत.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल. वरिष्ठ खुश होतील. राशीस्वामी खुश आहे. चिकित्सा आणि संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. आत्मविश्वास कमी होईल. स्वप्ने साकार होतील. मात्र विनाकारण वाद घालू नका. वाहन, संगणक, मोबाईल यांची दुरुस्ती करावी लागेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. वरिष्ठ खुष होतील. प्रवास घडतील. जलविहार कराल. कुलदेवतेची उपासना करा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. पुरेशी प्रगती होईल. नात्यातून लाभ होतील. पत्नीकडून अपेक्षा वाढतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. धन धान्य वाढेल. नवीन संधी चालून येतील. पत्नीचे उत्तम सहकार्य मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अष्टम आणि नवम स्थानी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. वाहन सुख लाभेल. आरोग्यासाठी खर्च वाढतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. साडेसातीचा प्रभाव आज अधिक जाणवेल. श्री हनुमान उपासना करा. प्रिय व्यक्तीकडून लाभ होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!