आजचे राशिभविष्य शनिवार,३० ऑगस्ट २०२५
३० ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद शुक्ल सप्तमी/अष्टमी. विश्वासूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज वर्ज्य दिवस आहे”
नक्षत्र: विशाखा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी– तुळ/(सकाळी ७.५३ नंतर) वृश्चिक. (एइंद्र योग)
३० ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर गुरु रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यात आशावाद, उदारपणा आहे आणि तुम्ही नशीबवान आहात. वृत्ती धार्मिक असून प्रवासाची आवड आहे. तिर्थस्थळांना भेटी देणे तुम्हाला आवडते. शिक्षण क्षेत्रात तुम्ही यश मिळवतात. तुम्ही शांत, प्रामाणिक, कृतिशील आहेत. अडचणींचा तुम्हीजोरदार सामना करू शकतात. तुम्हाला आयुष्यत उशिरा प्रसिद्धी आणि सुख मिळते. तुम्ही अत्यंत गुणवान आहात मात्र स्वभाव संशयी आहे. मान – पान बद्दल तुम्ही जास्त संवेदनशील असतात. तुमच्यात अधिकार वृत्ती, महत्वाकांक्षा, उत्स्फूर्तपणा आणि पोकळ दिखाऊ वृत्ती असते. एकांतवास आवडतो. जीवनाचा आनंद उपभोगता. भिन्न लिंगी व्यक्तीचे आकर्षण असते. तुम्ही मनाने हळुवार आणि संवेदनशील असतात. तुम्ही ध्येयवादी आहात. एक उत्तम व्यवस्थापक आणि प्रशासक असतात.कला, साहित्य, मनोरंजन आणि विज्ञान याची तुम्हाला आवड असते. तुम्ही साहित्य निर्मिती आणि कथा लेखक बनू शकतात. तुम्ही शुद्ध प्रेम असणारे, नैतिक, कायदा प्रेमी, दयावान, न्यायी आणि परोपकारी आहात. इतरांना मदत करणे तुम्हाला आवडते. तुम्ही इतरांशी उत्तम संवाद साधू शकतात. दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत घेतात. तुम्ही धार्मिक आहात मात्र भावनाशील नाहीत. तुम्ही संयमी आहात. सहसा भावनेच्या आहारी जात नाहीत. तुमच्यामध्ये अफाट इच्छाशक्ती आणि उत्साह आहे. कामामध्ये सातत्य असते. तुम्ही प्रत्येक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडवतात. स्वतःचे काम स्वतः करणे तुम्हाला आवडते. त्या कामात इतरांनी ढवळाढवळ केलेली चालत नाही. तुम्ही शक्यतो एकटे राहतात. बुद्धिमान व्यक्तींकडे तुमचा ओढा असतो. जीवनात तुम्ही यशस्वी होतात. तुम्ही न्यायाधीश, धर्मगुरू, तत्त्वज्ञानी, शिक्षक होऊ शकतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. दिखाउपणाची जराशी तुम्हाला आवड असते. मनाने तुम्ही तरुण असतात आणि वृत्तीने आनंदी असतात. मैदानी खेळांची तुम्हाला आवड आहे. तुम्ही मनाने उदार आणि सहिष्णू आहात. इतरांचा द्वेष करणे, मत्सर करणे तुम्हाला आवडत नाही. तुमचा गैरफायदा इतरांनी घेऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे.
व्यवसाय:- न्यायमूर्ती, सेक्रेटरी, राजदूत, मुत्सद्दी, उच्चपदस्थ अधिकारी, संरक्षण खाते, प्राध्यापक, धार्मिक प्रवचनकार, डॉक्टर, शिक्षक, मोल्डिंग, तेल गिरण्या, शेती, जंगल, कारखाने, लाकूड, खनिज द्रव्य, खाद्यपदार्थ.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, लसण्या, अमेथीस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अष्टम चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. जबाबदारी वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. मनात विचाराचे वादळ निर्माण होईल. जलपर्यटन टाळावे. घशाची काळजी घ्यावी.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू, वे, वो) सप्तम स्थानी चंद्र आहे. मन संभ्रमित करणाऱ्या घटना घडू शकतात. हाताशी आलेली संधी जाऊ नये याची काळजी घ्या. अनुकूल शनी तुम्हाला आनंद प्रदान करेन. प्रगती साध्य होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) षष्ठ स्थानी चंद्र आहे. काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. व्यापार वाढेल. अचानक एखादा खर्च निघू शकतो. नोकरीच्या ठिकाणी कामानिमित्त अधिक मेहनत घ्यावी लागले मात्र त्याचे उत्तम फळ मिळणार आहे.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) भेटवस्तू मिळतील. मनासारखी कामे पूर्ण होतील. मन उत्तेजित राहील. स्वप्ने साकार होतील. लॉटरी मधून लाभ मिळतील. प्रेमात यश लाभेल. संतती बाबत खुश खबर मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. जमीन व्यवहारात लाभ होतील. छोटी सहल घडेल. कर्मस्थानी हर्षल आहे. हातून चुकीचे काम होणार नाही याची काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तृतीय स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ उत्तम होतील. अधिकार वाढतील. सामाजिक वजन वाढेल. आज अनोळखी इसमाचा सल्ला देखील मोलाचा ठरेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नात्यातून लाभ होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चांगले अनुभव येतील. कामात प्रगती होईल. कामाचा वेग वाढेल. पैशांची तजवीज होईल. मात्र अष्टम हर्षल आहे याचे भान ठेवावे लागेल. विश्वासू व्यक्तीचा सल्ला मानणे हिताचे आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. मन आनंदी राहील. कोणत्याही गुंत्यात गुंतू नका. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांचेकडून आज भ्रमनिरास होऊ शकतो. कुटुंबासोबत आज काही निवांत क्षण व्यतीत कराल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. कामाचे नियोजन बदलले जाईल. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील. षष्ठ स्थानी हर्षल आहे. शत्रूंला कमी लेखू नका. कनिष्ठ सहकारी अडचणीत आणू शकतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील. नवीन संधी चालून येतील. सप्तम शुक्र तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्तींना प्रवेश देईन. प्रिय व्यक्तीची भेट होईल. तृतीय शनी आणि नेपच्यून तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. भ्रमंती घडेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दशम स्थानी चंद्र आहे. व्यावसायिक वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. मात्र नफा देखील वाढणार आहे. आरोग्य सुधारेल. भांडवल उभारणी होईल. नवीन प्रकल्प उभे कराल. समाजकार्य करताना वेळेचे भान ठेवा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रसन्न ग्रहमान आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. व्यावसायिक कामातून यश मिळेल. आरोग्य विषयक प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोणताही मोठा निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या. तुमचे जे आदर्श आहेत त्यांचा सल्ला मानणे हिताचे आहे.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
