कलानंद तर्फे ‘कथक अभिव्यक्ती’ कार्यक्रमाचे आयोजन

0

नाशिक, दि. १२ सप्टेंबर २०२५ Cultural Events in Nashik नाशिक शहरातील शास्त्रीय नृत्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवलेल्या कलानंद कथक नृत्य संस्थेचे यंदा ४६ वे वर्ष सुरू होत आहे. या निमित्ताने संस्थेतर्फे एक भव्य ‘कथक अभिव्यक्ती’ हा नृत्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक तंत्र, ताल व भावाभिनय यांचा सुंदर संगम रसिकांना अनुभवता यावा, यासाठी खास संकल्पना घेऊन हा कार्यक्रम सादर होणार आहे.

या नृत्यप्रयोगामध्ये कलानंदचे नवोदित तसेच पारंगत विद्यार्थी सहभाग नोंदवणार असून, कथक नृत्याच्या विविध अंगांची बहारदार प्रस्तुती ते करणार आहेत. तीनताल, झपताल, धमार आणि जैत ताल यांचे पारंपरिक व तांत्रिक सादरीकरण या प्रयोगाची खासियत ठरणार आहे. अभिनय अंगात पं. बिरजू महाराज यांच्या अप्रतिम पद्यरचनांमधील भावविश्वाला अभिव्यक्ती मिळणार आहे.

या कार्यक्रमाचे दिग्दर्शन सौ. संजीवनी कुलकर्णी आणि डॉ. सुमुखी अथणी यांनी संयुक्तरीत्या केले आहे. नृत्य प्रस्तुतीसाठी नाशिकमधील प्रथितयश कलाकारांची साथ लाभणार असून, श्री. व्यंकटेश तांबे (तबला), श्री. पुष्कराज भागवत (संवादिनी व गायन) आणि श्री. अनिल धुमाळ (सिंथेसायझर) आपला सुरेल वाद्यवृंद सादर करणार आहेत.

Cultural Events in Nashik हा विशेष कार्यक्रम मंगळवार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कालिदास कलामंदिर, नाशिक येथे रंगणार आहे. रसिकांसाठी हा कार्यक्रम मोफत व सर्वांसाठी खुला असून, नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कलात्मक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!