आजचे राशिभविष्य शनिवार, १३ सप्टेंबर २०२५

१३ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

भाद्रपद कृष्ण षष्ठी/सप्तमी. विश्वावसूनाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

आज क्षयतिथी आहे”

नक्षत्र: कृतिका (रवी) / (सकाळी १०.११ नंतर) रोहिणी (चंद्र).

आज जन्मलेल्या बाळाची राशी- वृषभ. (*विषकन्या योग*, हर्षणयोग, विष्टी करण शांती)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

१३ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)

तुमच्यावर हर्षल आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्हाला मोठ्या हुद्द्याच्या जागा मिळतात. तुम्ही चांगले पैसे कमवतात. तुमच्यात चिकाटी असते. इच्छाशक्ती प्रबळ असते. शरीर सुदृढ, स्मरणशक्ती चांगली असते. स्वतःच्या शक्तीचा तुम्हाला स्वतःला परिचय झाल्यास अशक्य असे काहीच उरत नाही. तुम्हाला कला, साहित्य, वाङ्मय, शास्त्रीय पुस्तके यांची आवड असते. तुम्ही विश्वासू असतात. इतरांबद्दल सहानुभूती असते मात्र तुम्ही जरासे हट्टी असू शकतात.

तुमची शरीरयष्टी चांगली आहे. डोळे बोलके असतात. भिन्न लिंगी व्यक्तीपासून फायदा होतो. मित्र परिवार कमी असतो. वाद विवाद झाल्यास त्याची तुम्ही फिकीर करत नाहीत. स्वतःचा व्यवसाय केल्यास यश मिळते. स्वभाव काहिस अस्थिर असू शकतो. आयुष्यच्या उत्तरार्धात मोठे यश मिळते.

तुमच्या जीवनात आणि विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. तुम्हाला काही विलक्षण घटनांचा जीवनात अनुभव येतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे आणि व्यापारी वृत्ती आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि शास्त्रीय आहे. उत्साह, प्रगती आणि जोम ही तुमचे वैशिष्ट्ये आहेत. जीवनात अनेक चढउतार अनुभव येतात. कोणत्याही कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम नियोजन करतात. मानवतेच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला नाविन्य आणि प्रवासाची आवड असते. तुम्हाला जुन्या परंपरा आणि रूढी आवडत नाहीत. जीवनात सतत बदल असावा असा तुमचा विचार असतो. तुमचा मित्र परिवार सतत बदलत असतो. तुम्ही अहंकार आणि हट्टीपणा टाळला पाहिजे आणि डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये ठामपणे असतो.

व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, राजदूत, बँकिंग, आयात निर्यात, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, डॉक्टर, काननाकडोळे स्पेशालिस्ट, संशोधन, ज्योतिष.

शुभ दिवस:- रविवार, सोमवार आणि शनिवार.

शुभ रंग:- तपकिरी, निळा आणि पांढरा.

शुभ रत्न:- हिरा, पोवळे आणि मोती.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) पंचम स्थानी सूर्य – बुध युती आहे. मन प्रसन्न राहील. काव्य- शास्त्र- विनोद यात दिवस व्यतीत होईल. वक्तृत्व गाजेल. परदेश प्रवास घडेल. खर्चात वाढ झाली तरी मन सुखी राहील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) उत्तम दिवस आहे. कुटुंबासाठी खरेदी होईल. संतती बाबत खुश खबर मिळेल. प्रिय व्यक्ती साठी वेळ द्याल. सौख्य लाभेल. पशु – पक्षी यांच्यासमवेत वेळ व्यतीत कराल. वाहन सुख लाभेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. अर्थकारण काही प्रमाणात सुधारेल. सर्वांना खुश कराल. आनंद मिळेल. खर्च वाढेल. महत्वाचे सल्ले मिळतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवस अत्यंत अनुकूल आहे. मनासारखी कामे पार पडतील. प्रवास घडतील. व्यावसायिक लाभ होतील. धार्मिक कार्य घडेल. वक्तृत्व चमकेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ वाढतील. सरकारी कामात यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. खुशखबर मिळेल. तुमच्या बुद्धीची कसोटी लागेल. त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. कामाचा व्याप वाढेल. आर्थिक लाभ होतील. आनंदी रहाल. प्रवास घडतील. सरकारी कामे पूर्ण होतील मात्र त्यासाठी खर्च वाढेल. यंत्र दुरुस्ती कराल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. सौख्य लाभेल. कठोर मेहनत केल्यास उत्तम लाभ होतील. अनुकूल रवी – बुध युती तुम्हाला स्थैर्य आणि प्रगती देईन. कामे मार्गी लागतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) गुंतवणुकीतून लाभ मिळतील. सामाजिक कार्यात यश मिळेल. कनिष्ठ व्यक्तीची साथ लाभेल. स्पर्धेत विजयी व्हाल. दशम स्थानातील रवी तुमच्या कार्याचे कौतुक करवून देईन. वरिष्ठ खुश होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/ व्यवसायात अनुकूलता वाढेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. गुंतवणूक वाढेल. योग्य दिशेने मार्गक्रमण कराल. प्रवास घडतील. मात्र प्रवासात काळजी घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल आणि उत्साही दिवस आहे. स्वप्ने पूर्ण होतील. शेतीतून लाभ होतील. वाहन सौख्य लाभेल. धनलाभ होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. चतुर्थ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्यात यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. तुमच्या प्रतिस्पर्ध्याला आज माघार घ्यावी लागेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवासातून लाभ होतील. मनासारखी कामे होतील. आर्थिक नियोजन करा. मित्रांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यातीलकलागुण आणि अधिकार यांचा आज तुम्हाला भरपूर लाभ होणार आहे. मात्र त्याचा योग्य वापर करा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] आजचे राशिभविष्य शनिवार, १३ सप्टेंबर २… […]

Don`t copy text!