आजचे राशिभविष्य रविवार, १४ सप्टेंबर २०२५

१४ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

भाद्रपद कृष्ण अष्टमी. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

आज चांगला दिवस आहे”

चंद्रनक्षत्र – रोहिणी/ (सकाळी ८.४१ नंतर) मृग.

आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ/(रात्री ८.०४ नंतर) मिथुन. (वज्र योग शांती)

१४ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)

तुमच्यावर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही दिसायला चांगले असून अत्यंत लोकप्रिय आहात. तुम्ही इतरांना सहसा दुखावत नाहीत. कमी बोलणे तुम्हाला हिताचे वाटते. तुम्ही सहसा स्वतःची गुपिते इतरांना सांगत नाहीत. तुमची निरीक्षण शक्ती उत्तम आहे. तुम्हालाकोडी सोडवणे, लॉटरी, शेअर्स यांचा नाद असतो. लहान वयात एखादे प्रेमप्रकरण संभवते. तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा टवू शकतात. व्यावसायिक यश चांगले मिळते.गूढ विद्याची तुम्हाला आवड असते मात्र त्यासाठी अभ्यासाचे कष्ट घेण्याची तयारी नसते. तुमचा विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो आणि विवाहानंतरभाग्योदय होतो. तुम्ही अत्यंत बुद्धिवान, धूर्त, जलद काम करणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. तुम्ही उदार आणि विशाल मनाचे असून इतरांचा आदर आणि कदर करतात. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. आणि कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व चटपटीत आणि प्रसन्न आहे. तुमचे बोलणे आणि दिसणे आकर्षक आहे. तुमच्यात समजूतदार पण असतो. स्वतःचे विचार मित्रांना समजून सांगण्याची हौस असते. तुमचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला माहीत असतं आणि त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, दागिने, सुगंधी द्रव्य याचे तुम्हाला आकर्षण असते. समाजाच्या सर्व थरात मिसळणे आणि समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. इतरांना तुम्ही सतत मदत करत असतात. तुम्हाला धर्म आणि तत्वज्ञान यांची विशेष आवड आहे तसेच प्रवास करणे आवडते. *स्त्रियांना प्रसूतीबाबत काही अडचणी येऊ शकतात*.

व्यवसाय:- वकील, मेडिकल, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, मेडिकल स्टोअर्स, अकाउंट, पॅथॉलॉजी, स्टॅटिस्टिक.

शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.

शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.

शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगल आणि शुक्राशी शुभ योग तर सूर्यशी बुधाशी आणि शनिशी अशुभ योग आहे. धाडसी निर्णय घ्याल. सन्मान मिळतील. यश प्राप्ती होईल. काही शत्रूंशी जुळवून घ्यावे लागेल. कधीकधी माघार घेणे हिताचे असते.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कुटुंब सुख लाभेल. मन आनंदी राहील. कामात काही बदल घडतील. सामाजिक क्षेत्रात वजन वाढेल. राजकीय पदे मिळतील. कला प्रांतात चमक दाखवाल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सुटीचा आनंद घ्याल. लेखकांना/प्रकाशकांना यश लाभेल. समाज माध्यमावर लेखन करतांना सावधानता बाळगा. आवडत्या व्यक्तीसाठी खर्च कराल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. वेगळ्या वाटेने जाल. धन संपत्ती वाढेल पण खर्च देखील वाढेल. नात्यात तुमच्या शब्दाला मान मिळेल. मात्र तडजोड करताना फार ताणू नका.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल. आज दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल. रंगाचा बेरंग होऊ शकतो. आवडत्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल. मन प्रसन्न राहील. व्यवसाय वाढेल. कामाचा ताण आज जास्त असणार आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सुरुवात फारशी चांगली नाही. तरीही काही चांगल्या घटना घडतील. त्याने मनाची उदासी दूर होईल. उत्तरार्धात अनुकूल दिवस आहे. संकटे दूर होऊ लागतील. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. आनंद वार्ता समजतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. पूर्वार्ध चांगला आहे. विवेकबुद्धीचा वापर कराल. सुखद अनुभव येतील. मनाचा मोठेपणा दाखवा. कामाच्या ठिकाणी मन काहीसे अस्वस्थ राहील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. जोरदार प्रगती होईल. उच्च शिक्षणात यश मिळेल. सरकारी नोकरीतील नातेवाकांशी संपर्क होईल. त्यांच्याशी साधक बाधक चर्चा होईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. धन धान्य वाढेल. नवीन संधी चालून येतील. अंदाज अचूक ठरतील. आरोग्य मात्र सांभाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चतुर्थ आणि पंचम स्थानी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. वाहन सुख लाभेल. आनंदी रहाल. संकटात मित्रांची साथ लाभेल.

मीन:– (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. साडेसातीचा प्रभाव आज कमी जाणवेल. ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!