आजचे राशिभविष्य सोमवार, १५ सप्टेंबर २०२५
१५ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद कृष्ण नवमी. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – मृग/(सकाळी ७.३२ नंतर) आर्द्रा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन. (व्यतिपात योग शांती)
“आज व्यतिपात, वर्ज्य दिवस आहे.” *अविधवा नवमी* नवमी श्राद्ध.
१५ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर शुक्र आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. तुमचे वक्तृत्व चांगले असते. तुम्ही झटपट निर्णय घेतात. तुमचे विचार स्वतंत्र असतात. आपल्या आयुष्यात काहीतरी सनसनाटी घडावे असे तुमहाल सतत वाटत असते. मोठेपणा, प्रतिष्ठा मान सन्मान यास तुम्ही अधिक महत्व देतात. तुम्ही सतत कामात मग्न असतात. गूढ विषयांचे तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही संशोधक वृत्तीचे, आशावादी, दिमाखदार आहात. तुम्हाला जुगार, कोडी, शेअर्स यांचा छंद असतो. तुम्ही एक बुद्धिमान कलाकार असतात. तुमच्या कलेचा तुम्ही व्यवसायिक दृष्ट्या पूर्ण वापर करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते आणि त्याचा उपयोग व्यवसायात होतो. तुमचा सहवास इतरांना सुखावतो. नीती आणि अनिती याबद्दलच्या तुमच्या कल्पना जरा वेगळ्या असतात त्यामुळे इतरांना त्या समजत नाहीत. तुम्ही जुन्या परंपरा पाळत नाहीत. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. तुमचे वक्तृत्व चांगले असते. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतो. तुमचे आयुष्य आरामदायक आणि भौतिक सुखाने पूर्ण असते. उत्तम कपडे, सुगंधीत द्रव्य आणि महागड्या गाड्यांची तुम्हाला आवड असते. प्रेमात तुम्ही संशयी असतात.
व्यवसाय:- संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, बेकरी, हॉटेल मॅनेजमेंट, बँकिंग, मेडिकल स्टोअर्स, शेअर ब्रोकर, कमिशन एजंट, इस्टेट ब्रोकर.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा आणि गुलाबी.
शुभ रत्न:– पाच मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:- अनुकूल ग्रहमान आहे. स्वप्ने साकार होतील. सर्व प्रकारचे लाभ होतील. मन आनंदी राहील. प्रगतीची घोडदौड चालू राहील. संकटे कमी होऊ लागतील.
वृषभ:– अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. अचानक एखादा सुखद अनुभव येऊ शकतो. नोकरीत चांगले अनुभव येतील. कीर्तन प्रवचन यात रस निर्माण होईल.
मिथुन:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. संयम ठेवल्यास चांगले लाभ होतील. दानधर्म कराल. धन धान्य वाढेल. मेजवानी मिळेल. धार्मिक अधिष्ठान लाभेल.
कर्क:– संमिश्र दिवस आहे. फारशी अनुकुलता नाही. आर्थिक लाभ वाढतील. मनासारखा खर्च कराल. दानधर्म करण्यास उत्तम कालावधी आहे. गरिबांना मदत कराल.
सिंह:– अत्यंत अनुकूल दिवस आहे. लाभ स्थानी चंद्र आहे. सिद्धी आणि प्रसिद्धी मिळेल. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. जलपर्यटन टाळा. मौल्यवान वस्तू सांभाळा.
कन्या:– अनुकूल दिवस आहे. मनाप्रमाणे घटना घडतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास घडतील. जोडीदाराचागैरसमज होणार नाही याची काळजी घ्या.
तुळ:– सौख्य प्रदान करणारा दिवस आहे. मन आनंदी राहील. मात्र संमिश्र अनुभव येतील. घरगुती कामे मार्गी लागतील. सर्दीचा त्रास जाणवेल. जुनाट दुखणेडोके वर काढू शकते. आवश्यक ती औषधे प्रवासात जवळ बाळगा.
वृश्चिक:- अष्टम स्थानी चंद्र आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची अनमोल साथ लाभेल. व्यवसाय वाढ होईल. राजकीय क्षेत्रात जपून वाटचाल करा. मूल्यवान नाती तुटणारनाहीत याची काळजी घ्या. इतरांच्या माघारी त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका. नंतर तीच माणसे कामाला येणार आहेत.
धनु:- सप्तमी स्थानी चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. नात्यातून लाभ होतील. पाहुण्यांचे येणे जाणे वाढेल. आरोग्य सांभाळा. शेतातून चालताना काळजी घ्या. विहिरीजवळ गेल्यास विशेष लक्ष ठेवा.
मकर:– कौटुंबिक कामात वेळ जाईल. आनंदात दिवस व्यतीत होईल. घरात काही मोठे बदल कराल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
कुंभ:- उत्तम दिवस आहे. आर्थिक आवक वाढेल. वेळ दवडू नका. प्रिय व्यक्तीसोबत वेळ व्यतीत कराल. आरोग्यात सुधारणा होऊ लागेल. वयस्कर व्यक्तींनी बुद्धिवर्धक व्यायाम करावेत.
मीन:- चंद्राचा तुमच्या राशीतील नेपच्यूनशी केंद्र योग आहे. नियोजन बदलावे लागेल. घरगुती कामासाठी वेळ द्याल. सामाजिक कार्यात अग्रभागी रहाल. मनात बंडखोर विचार येतील. त्यांना नियंत्रणात ठेवा.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
