आजचे राशिभविष्य गुरूवार, १८ सप्टेंबर २०२५
१८ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक(Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद कृष्ण द्वादशी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे” सकाळी ६.३३ पर्यंत गुरू पुष्यामृत.
चंद्र नक्षत्र – पुष्य/ (६.३३ नंतर नंतर) आश्लेषा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.
१८ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर मंगळ आणि बुध या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सभ्य आणि प्रामाणिक आहात. कोणतीही जबाबदारी घेतली तरी त्यात तुम्हाला यश मिळते. स्वातंत्र्य, वक्तृत्व, मोठेपणा, मानिपणा, प्रतिष्ठा, हरहुन्नरी स्वभाव ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. स्वतः सतत अभ्यास करणे आणि इतरांना त्यासाठी प्रवृत्त करणे तुम्हाला आवडते. तुम्ही एक उत्तम शिक्षक असू शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळते. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुम्ही आक्रमक, धाडसी आणि तडफदार आहात. लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही विनाकारण इतरांची कुरापत काढतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून आपल्या विषयाची संपूर्ण माहिती तुम्हाला असते. स्वतःच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास असतो आणि ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. अनेकदा तुम्ही उतावळेपणाने नवीन नवीन योजनांमध्ये प्रवेश करतात. संभाषण कलेत तुम्ही प्रवीण आहात. तुम्हाला जीवनामध्ये अधिकार आणि मानसन्मान मिळतो. अनेकदा तुमची चूक तुम्ही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळ आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्हाला गरिबांवर दया करण्यात एक आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःच्या इच्छाशक्तीने बरे करू शकतात. तुम्ही तापट आहात
(Marathi Rashi Bhavishya)
व्यवसाय:- राजकीय क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, लोखंडाशी संबंधित व्यवसाय, इंजीनियरिंग, खाण, बांधकाम, पुढारी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- तांबडा, हिरवा आणि पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चतुर्थ चंद्र आहे. हा प्रतिकूल समजला जातो मात्र आज तुम्हाला सौख्य लाभेल. घरगुती कामे आज पूर्ण करा. त्यासाठी अर्थातच आर्थिक व्यय होईल. मात्र उशीर करू नका. धैर्य ठेवून वाटचाल करा. कोर्ट कामात अपेक्षीत यश मिळणार नाही.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्यासाठी आज पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे. त्यातून तुम्हाला सुख लाभेल. तुमच्या मृदू स्वभावाच्या विपरीत आज तुम्ही निर्णय घ्याल. मात्र काहीही झाले तरी आज आर्थिक लाभ होणारच आहेत.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्च वाढवणारा दिवस आहे. मात्र सगळेच खर्च काही वाईट नसतात. तुमच्या मिश्किल आणि बोलक्या स्वभावाचा आज तुम्हाला फायदा होईल. अनुकूल सूर्याची भरभक्कम साथ आहे. सोबत बुध आहे. बौद्धिक क्षेत्र तुम्ही गाजवून टाकाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. तुम्हाला भोजन बनवणे आणि चविष्ट पदार्थ खाणे आवडते. याबाबतीत आज तुमच्या मनासारखे होईल. आवडत्या खाण्यासाठी आणि मेजवानीसाठी खर्च कराल. धनलाभ होईल. तृतीय रवी तुम्हाला भरभक्कम साथ देत आहे. प्रगती होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बारावा चंद्र आहे. त्यामुळे खर्च तर वाढणारच! मात्र काळजीचे कारण नाही. आर्थिक आवक वाढणार म्हणूनच तर तुम्ही खर्च करणार ना! अनुकूल शुक्र तुम्हाला काही कमी पडू देणार नाही.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चंद्र अनुकूल आहे त्यामुळे मन एकदम प्रसन्न राहील. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कायम हसतमुख असतात. त्यामुळे प्रतिकूल ग्रहांची काळजी नको. तुमच्या निरागस स्वभावाचा तुम्हाला आज फायदा होईल. उपासना केल्यास आजचा दिवस तुम्हाला चांगला जाईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दशम स्थानी चंद्र आहे. सौख्याचा दिवस आहे. अर्थात सुख हे मानण्यावर अवलंबून आहे. खर्च वाढणार आहे मात्र संध्याकाळ आनंदात घालवाल. पहिल्या मंगळामुळे शत्रूभय आहे. विनाकारण कोणाशीही वाद वाढवू नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुम्ही मुळात अत्यंत कार्यक्षम, आक्रमक आणि राजकारणात तरबेज आहात. त्यामुळे राजकीय क्षेत्रात तुमचा दबदबा असतो. साहजिकच काही लोकांना तुमचा मत्सर वाटतो. आज त्याचा अनुभव येईल. त्यामुळे काहीसे सावध रहा. तुमची गुपिते कोणालाही उघड करू नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अष्टम स्थानी चंद्र आहे. हे स्थान फारसे शुभ समजले जात नाही. मात्र तुम्ही शांत, संयमी आणि सत्तात्यपूर्ण कामासाठी प्रसिद्ध आहात. आज त्याच बळावर वाटचाल करावी लागेल. अनुकूल मंगळ तुम्हाला धैर्य, आर्थिक बळ आणि मानसिक ताकद देईन.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सप्तम स्थानी चंद्र आहे. तुम्ही दिरघोद्योगी, सहनशील आणि विशाल हृदयाचे आहात. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही स्वतःला निभावून नेऊ शकतात. आज ग्रहमान अनुकूल आहे त्यामुळे सौख्य लाभेल. भेटवस्तू मिळतील. कपडे खरेदी होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) षष्ठ स्थानी चंद्र असल्याने तुम्हाला आज आळस येणे साहजिक आहे. मात्र आज तुम्हाला कामाला जुंपून घ्यावे लागेल. आर्थिक आवक वाढेल. जुनी रेंगाळली कामे आज पूर्ण करावी लागतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पंचम स्थानी चंद्र आहे. तुम्ही काहीही ठरवले तरी ऐनवेळी तुमचे नियोजन बदलते याचा आज अनुभव येईल. तुमच्या राशीत शनी महाराज मुक्कामी आहेत. त्यांना कामचोरी आणि खोटेपणा आवडत नाही याचे भान ठेवा. व्यय स्थानी राहू आहे. जपून वाटचाल करा.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य गुरूवार, १८ सप्टेंबर … […]