मुंबई, दि. १८ सप्टेंबर २०२५ – Shivaji Park Incident दादरच्या शिवाजी पार्क परिसरात स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने पुतळ्यावर लाल रंग फेकून संतापजनक प्रकार घडवून आणला होता. हा प्रकार समजताच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
आरोपीची ओळख आणि कबुली(Shivaji Park Incident)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव उपेंद्र पावसकर असून तो ठाकरे गटाशी संबंधित कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे. पोलिस चौकशीत त्याने हा गुन्हा कबूल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संतापाची लाट आणि राजकीय प्रतिक्रिया
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा प्रकार जाहीर होताच शिवसैनिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. दादरपासून मुंबईतील विविध भागांत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.
राज ठाकरे यांनी २४ तासांच्या आत आरोपीला अटक करावी अशी ठाम मागणी केली होती.
उद्धव ठाकरे यांनीही हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत, “आई-वडिलांच्या नावाचा अभिमान न बाळगता पुतळ्याची विटंबना करणारा हा उद्योग महाराष्ट्र पेटवण्याचा डाव असू शकतो,” अशी भूमिका मांडली.
मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत, “दोषीला पोलिस लवकरच गजाआड करतील. परंतु या प्रकरणाला राजकीय रंग दिला जाऊ नये,” असे स्पष्ट केले.
पुढील कारवाई
आरोपीवर विटंबना व समाजकंटक कृत्य या गंभीर गुन्ह्यांखाली कारवाई
पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीच्या पार्श्वभूमीचा शोध सुरू आहे
पुतळ्याची पुन्हा स्वच्छता व दुरुस्ती करण्याचे काम महानगरपालिकेकडून हाती घेतले आहे