नाशिक, दि. १९ सप्टेंबर २०२५ – Nashik Power Cut News महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा व योग्य दाब मिळावा यासाठी महापारेषणच्या १३२ केव्ही टाकळी सबस्टेशनमध्ये महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामाअंतर्गत ३३ केव्ही एकेरी वाहिनीचे दुहेरी वाहिनीत रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. २० सप्टेंबर) सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत शहरातील अनेक भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
कोणते भाग होणार प्रभावित?(Nashik Power Cut News)
या नियोजित कामामुळे टाकळी उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही वाहिनीवरील तपोवन रोड, टाकळी गाव, टाकळी रोड, उत्तरा नगर, शंकरनगर, द्वारका सर्कल, पुना रोड, मुंबई रोड, वडाळा रोड, पखाल रोड, अशोका मार्ग, ड्रीम सिटी, मेट्रो मॉल परिसर, बोधले नगर, रविशंकर मार्ग, रॉयल कॉलनी, बजरंगवाडी, हॅपी होम कॉलनी, सह्याद्री हॉस्पिटल, सिटी केअर हॉस्पिटल परिसर, बनकर चौक आदी भागात वीज पुरवठा खंडित राहील.
तसेच उपनगर उपकेंद्रातील ११ केव्ही वाहिनींवर गांधी नगर, अभिष नगर, पंचशील नगर, दत्त मंदिर परिसर, दीप नगर, सहकार कॉलनी, आंबेडकर नगर, जेके टायर जवळील परिसर, टागोर नगर, सिध्दार्थ नगर, समता नगर, इंद्रायणी सोसायटी, रामदास स्वामी नगर, खोडदे नगर, राहुल नगर, शांती पार्क, जामकर मळा, शेलार फार्म, पगारे मळा, अयोध्या नगर, सिंधी कॉलनी, व्यापारी बँक परिसर, आम्रपाली, श्रम नगर, नंदन व्हॅली, महारुद्र कॉलनी, रघुवीर कॉलनी, लोखंडे मळा, तिरुपति नगर, खरजुळ मळा, डीजीपी नगर, वडाळा शिवार व विधाते नगर या भागातही वीज खंडित राहणार आहे.
याशिवाय ११ केव्ही अर्टीलरी वाहिनीवरील मनोहर गार्डन, जयभवानी रोड, जेतवन नगर, देवळाली गाव परिसर आणि ११ केव्ही नाशिक रोड वाहिनीवरील नाशिक–पुणे रोड, उपनगर पोलीस स्टेशन, आय क्वार्टर, एक्झिक्युटिव्ह अपार्टमेंट, स्टार झोन मॉल परिसर, बिर्ला हॉस्पिटल, दत्त मंदिर व आंबा सोसायटी परिसरातही वीज पुरवठा बंद होईल.
वेळेत काम पूर्ण झाल्यास वीज लवकर सुरू
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, नियोजित वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास वीज पुरवठा लवकर सुरू केला जाईल. मात्र तांत्रिक कारणास्तव कामास विलंब झाल्यास पुरवठा सुरळीत करण्यात वेळ लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.