आजचे राशिभविष्य शनिवार, २० सप्टेंबर २०२५
२० सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
भाद्रपद कृष्ण चतुर्दशी. विश्वावसूनाम संवत्सर.
“आज वर्ज्य दिवस आहे”
नक्षत्र: मघा (केतू) / (सकाळी ८.०६ नंतर) पूर्वा (शुक्र).
आज जन्मलेल्या बाळाची राशी- सिंह. ( विष्टी, शकुनी करण शांती )
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
२० सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. मित्र परिवार मोठा असतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. वैचारिक लेखनाची आवड असते. भोवतो ढोंगी मित्रांचे जाळे असते. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी तुमचा भावनिक दृष्टीकोन असतो. वक्तृत्व आणि शब्दभांडार चांगले असते. आत्मविश्वास असू दुबळ्या लोकांना मदत करणे आवडते. तुम्ही ध्येयवादी आहात आणि तुमच्या मध्ये प्रचंड कल्पनाशक्ती आहे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुम्ही अतिशय हळवे असून लवकर अस्वस्थ होतात. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकतात. तुम्हाला जुगार किंवा कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुम्ही कष्टाळू पाहणी शांत असतात मात्र तडजोड करत नाहीत. विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असून मन कष्टी असते. भाषणे, लेखन आणि श्रुतिका लिहिणे तुम्हा आवडते. तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुम्हाला मानसन्मान मनापासून आवडतात. तुम्ही समाजामध्ये मिसळतात. कोणत्याही गोष्टीतील नावीन्य आणि प्रवासाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही हुशार आहात आणि शास्त्राची आवड आहे. तुमचा सहवास इतरांना उत्साहवर्धक वाटतो. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला बरे आणि वाईट नीटपणे समजते. नवनवीन कल्पना आणि भरपूर उत्साह यांचा संगम झाल्याने तुम्ही मोठमोठ्या प्रकल्पात काम करू शकतात. तुम्हाला स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमचा स्वभाव विनम्र असून तुम्ही कायदा प्रेमी आहात. तुम्ही अधिक वयस्कर माणसांकडे आकर्षित होतात.
व्यवसाय:– लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.
शुभ दिवस:– सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) पंचम स्थानी चंद्र आहे. आयुष्यात अनेक कसोटीचे क्षण येत असतात. मात्र तुम्ही त्यास धैर्याने सामोरे जातात. काही वेळेस दोन पावले मागे येणे गरजेचे असते. आज तुम्हाला मुत्सद्दीपणा दाखवावा लागणार आहे. सजग व्हा.
वृषभ:– (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) जमीन सुपीक असली की त्यात येणारे धान्य देखील दर्जेदार असते. तुमच्या मनाची जमीन आज सुपीक ठेवा. स्थावर संपत्ती, भाडेकरू यां बाबतीत आज वाद संभवतो. अनुकूल शनी तुम्हाला मदत करेन मात्र चूका करू नका.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उद्योग, व्यवसाय यात तुमचा वेळ जाणार आहे. त्यातून आर्थिक लाभ देखील होणार आहेत. नात्यात विनाकारण वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी आज तुमचे मन लागणार नाही. महिलांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) द्वितीय चंद्र आहे. तुमचा स्वभाव प्रेमळ आहेतरीही कधीकधी तुम्हाला विनाकारण मानसिक त्रास होतो. आज घरगुती भांडणाचा अनुभव येऊ शकतो. मात्र तुम्ही धार्मिक उपासक असल्याने तुमच्याकडे मानसिक बळ पुष्कळ आहे त्यामुळे काही काळजी करू नका.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. तुमच्यातील मूळचा उत्साह आज अधिक वाढणार आहे. आज तुम्ही काहीतरी नवीन घोषणा कराल. मात्र ग्रहमान अनुकूल नसल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. अष्टम शनीची नाराजी जाणवेल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज फारशी अनुकूलता नाही. काळजी घेतली पाहिजे. आज तुम्ही विनाकारण चिडचिड होण्याची शक्यता आहे. पैसे खर्च होतीलच पण तिरही मनासारखे समाधान लाभणार नाही. कठोर बोलणे टाळावे. महिलांकडून विनाकारण टोमणे सहन करावे लागू शकतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्राची अनुकूलता आहे मात्र इतर ग्रहांची आज नाराजी आहे. तुमच्या विकारांवर आज तुम्हाला नियंत्रण ठेवले पाहिजे. अन्यथा त्याचे दूरगामी दुष्परिणाम जाणवतील. आरोग्याकडे विशेष लक्ष दयावे लागेल. जल पर्यटन टाळावे.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दशम स्थानी चंद्र आहे. आज कर्म करत राहावे लागेल. फळाची अपेक्षा करू नका. कामातील सातत्य महत्वाचे आहे. प्रतिकूल मंगळाची फळे आज अधिक प्रकर्षाने जाणवतील. आर्थिक नुकसान संभवते.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असे तुमचे वर्णन करता येईल. तसे तुम्ही कायम भाग्यवान असतात. मात्र आज तुम्हाला कमी वेगाने प्रगती करावी लागेल. वाहन दुरुस्ती करावी लागू शकते. मौल्यवान वस्तू सांभाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. नाराज मंगळ तुमचा कामाचा ताण वाढवेन. नोकरीच्या ठिकाणी विनाकारण वाद होऊ शकतात. पत्नीकडून मदत मिळू शकते. महिलांना काहीसा सुसह्य दिवस आहे.
कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. ग्रहमानाची आज फारशी साथ नाही. तुमच्याबाबत महिलांचा /विशेषतः पत्नीचा, विनाकारण गैरसमज होऊ शकतो. मंगळाची आणि शनीची नाराजी आहे. श्री. गणेश आणि श्री. हनुमान उपासना करा. पाण्याजवळ जाणे टाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आज कोणतेही साहस करू नका. आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः महिलांसाठी आज फारशी अनुकूलता नाही. आज तुमच्या शत्रूंची संख्या वाढू शकते. एखादी अप्रिय बातमी येऊ शकते. श्री. गणेश उपासना करा.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य शनिवार, २० सप्टेंबर २… […]