ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
भाद्रपद अमावस्या. वर्षा ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज वर्ज्य दिवस आहे” *सर्वपित्री अमावस्या*
चंद्रनक्षत्र – पूर्वा/ (सकाळी ९.३२ नंतर) उत्तरा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह/(दुपारी ३.५८ नंतर) कन्या. (चतुष्पाद, नाग करण शांती)
२१ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ असून अपत्यांबद्दल विशेष प्रेम असते. तुमचा उत्साह दांडगा असतो. तुमच्या भोवती एक प्रकारचे वलय असून लोकांना मोहित करू शकतात. पुरुष व स्त्रिया या दोघांमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. वडिलोपार्जित संपत्तीत तुम्हाला वाटा मिळतो. आध्यत्मिक वृत्ती असते. इतरांना तुम्ही योग्य सल्ला देतात. आयुष्यात उशिरा प्रसिद्धी आणि मन सन्मान मिळतात. तुमचा कल सुखासीन जीवनाकडे असतो. इतरांचे बारीक दोष तुम्ही सहजगत्या काढू शकतात. तुम्हाला आपोआप अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. इतरांच्या कारस्थानाला तुम्ही बळी पडतात. तुमच्यात अति महत्वाकांक्षा असते. जास्त बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. अनाठायी काळजी कर्णयचा तुमचा स्वभाव असतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून मान मरातब आणि प्रतिष्ठा या गोष्टींची जपणूक करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आणि न्याय आवडतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. स्वतःबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा डोळसपणे करतात. तुम्ही टापटीप, व्यवस्थित आणि काटेकोर असता
व्यवसाय:- राजकीय नेते, न्यायाधीश, सचिव, धार्मिक शिक्षक, डॉक्टर, केमिस्ट, शैक्षणिक क्षेत्र.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरू आणि हर्षलशी शुभ योग तर सूर्यशी युती आणि शनिशी प्रतियुती आहे. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. संततीकडून चांगली बातमी समजेल. मात्र तुमच्या षष्ठ स्थानी आज ग्रहण आहे. त्यामुळे जपून पावले टाका. आज फार काही महत्वाचे घडणार नाहीये. आरोग्य जपावे लागेल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्या पंचम स्थानी रवी, चंद्र, केतू युती आहे. आज कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. आर्थिक बाबतीत सावध रहा. एखादा घोटाळा (scam) ची शक्यता आहे. दानधर्म करण्यास अनुकूल कालावधी आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साह वाढवणारी सकाळ आहे. कामाचा वेग वाढेल. अपेक्षित मित्रांचे संदेश येतील. गृहकलह होऊ शकतो. सामाजिक कार्यात विनाकारण गैरसमज संभवतात. आज दुपारी काही अप्रिय कामे करावी लागतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज सकाळ पासूनच तुम्ही धार्मिक आणि पारंपरिक कामात व्यस्त असणार आहात. धर्म कार्यासाठी तुम्ही प्रसंगी खर्च देखील करतात. आजही तसेच करणार आहात. कौटुंबिक कामासाठी वेळ द्यावा लागेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुम्हाला स्वातंत्र्य, शौर्य स्वाभिमान प्रिय असतो. आज सकाळी तुम्हाला या गुणांचा अनुभव येईल. मात्र दुपारनंतर काहीसे बंधन आल्यासारखे वाटेल. विश्रांती घेण्याची गरज भासेल. इच्छा असो किंवा नसो, धार्मिक कार्यात भाग घ्यावा लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) राशीस्वामी बुध तुमच्या राशीत उच्चक्षेत्री आहे. मात्र आज तुमच्या राशीत ग्रहण आहे. चंद्र बुध, सूर्य, केतू यांचे आज तुमच्या राशीत संमेलन आहे. समोर शनी आहे. त्यामुळे आज कोणतेही महत्वाचे कार्य करू नये. ‘जैसे थें’ परिस्थिती असू द्यावी. वादविवाद टाळावा. प्रवासात त्रास संभवतो.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज फारशी अनुकूलता नाही. व्यय स्थानी चंद्र, रवी, केतू, बुध आहेत. अनुकूल गुरू तुम्हाला संमिश्र सुख देईन. धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल. हर्षलचे शुभ योग काही सुखद धक्के देतील. मात्र यंत्र हाताळणी करताना काळजी घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) बरेच ग्रह अनुकूल आहेत. जीवनात काहीतरी सनसनाटी घडावे असे तुम्हाला वाटते. आज आळस झटकून कामाला लागावे लागेल. दिवस अत्यंत धावपळीच्या आणि गुंतागुंतीचा आहे. राजकीय क्षेत्रात छोटासा भूकंप होऊ शकतो.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज सुट्टीचा दिवस असला तरी नोकरीच्या ठिकाणी काहीतरी काम निघू शकते. त्यानिमित्त भ्रमंती घडू शकते. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मात्र कनिष्ठ सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुम्हाला कष्टाची सवयच आहे. भौतिक सुखे आणि वैराग्य यांत तुमची मानसिक ओढाताण होते. आज तुम्हाला याचा पुन्हा प्रत्यय येईन. मोक्षाकडे जाण्याचा मार्ग असूनही तुम्ही माया आणि मोहात अडकून पडाल. आज अपघाताचे भय आहे प्रवास टाळा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्या अष्टम स्थानात ग्रहण आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाहीये. तरीही त्याचीच काही फळे अनुभवास येतील. प्रकृतीची काळजी घ्या. मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. घरात बंद पडलेली घड्याळे आणि जुना इलेक्ट्रॉनिक कचरा असल्यास त्वरित फेकून द्या. आज जपजाप्य केल्यास उत्तम फळे मिळतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या सप्तम स्थानी अमावस्या आणि ग्रहण आहे. तुमच्या वागण्यातून इतरांचा गैरसमज होऊ शकतो. आज कोणत्याच ग्रहांची विशेष बलवत्ता नाही. विनाकारण शत्रुत्व ओढवून घेऊ नका. शत्रू बलवान असल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
