नाशिक, दि. २५ सप्टेंबर २०२५ – Nashik Social Event शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभारंभी नाशिक शहरात प्रथमच महिला सक्षमीकरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सातपूर येथील माळी समाज मंगल कार्यालयात भरविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात महिलांसाठी आरोग्य तपासणी, रोजगाराच्या संधी, नारीरत्न पुरस्कार वितरण तसेच उपस्थित प्रत्येक महिलेला भेटवस्तूंचे वाटप अशा बहुआयामी कार्यक्रमांचा समावेश होता.
या सोहळ्याचे आयोजन “संविधान आर्मी”च्या महिला जिल्हाध्यक्षा वंदना काळे, महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष रोहित शिंदे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ आणि सहकाऱ्यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन “नाशिक भूषण” अमोलभाऊ भागवत यांनी केले.
सोहळ्यात सक्षम कन्या विकास संस्थेच्या ज्योतीताई काजळे, युनिटी फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड. एकताताई कदम, उद्योजक व मोटिव्हेशनल स्पीकर शशिकांत बोडके आणि विवेक फाऊंडेशनच्या अध्यक्षा लक्ष्मीताई ताठे यांच्या सहकार्याने महिलांना भेटवस्तू वाटप करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती(Nashik Social Event)
या भव्य सोहळ्यास बीड जिल्ह्यातील दारूबंदी अभियानाच्या मुख्य संघटक सत्यभामाताई सौंदरमल, आरपीआय नेत्या व संविधान आर्मी प्रतिनिधी काजलताई गवई गायकवाड, तसेच नाशिक महापालिका आयुक्त मा. मनीषा खत्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच माळी समाज अध्यक्ष निलेश भंदुरे, माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव, शिवसेना व विविध संघटनांचे मान्यवर, समाजसेवक, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नारीरत्न पुरस्कार वितरण
समाजात सक्रीय आणि प्रामाणिक कार्य करणाऱ्या नऊ महिलांना “नारीरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
विशेष आकर्षण
कार्यक्रमाची सुरुवात मा. प्रशांत शेळके यांच्या कन्यांनी केली. सूत्रसंचालन काजलताई परदेशी यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.एकाच व्यासपीठावर अमोलभाऊ भागवत आणि सत्यभामाताई सौंदरमल या दोन धडाडीच्या नेत्यांचे मार्गदर्शन मिळाल्याने नागरिकांचा उत्साह दुप्पट झाला.हा महिला सक्षमीकरण सोहळा नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी नाशिकच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी नवी दिशा ठरल्याचे मान्यवरांनी मत व्यक्त केले.