आजचे राशिभविष्य शनिवार, २७ सप्टेंबर २०२५
२७ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
अश्विन शुक्ल पंचमी/षष्ठी. विश्वावसूनाम संवत्सर.
“आज चांगला दिवस आहे”
नक्षत्र: अनुराधा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- वृश्चिक.
२७ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर मंगळ आणि बुध या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा असतो. तुम्ही अत्यंत भावनाशील आणि संवेदनशील आहात. इतरांना तुमच्या स्वभावाचा नेमका अंदाज येत नाही. तुम्हाला न्याय आणि त्याग या भावनांबद्दल विलक्षण आदर असतो. त्यासाठी तुम्ही स्वतःच्या खिशातून खर्च करण्यास देखील तयार असतात. तुम्ही सभ्य आणि प्रामाणिक आहात. कोणतीही जबाबदारी घेतली तरी त्यात तुम्हाला यश मिळते. स्वातंत्र्य, वक्तृत्व, मोठेपणा, मानिपणा, प्रतिष्ठा, हरहुन्नरी स्वभाव ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. स्वतः सतत अभ्यास करणे आणि इतरांना त्यासाठी प्रवृत्त करणे तुम्हाला आवडते. तुम्ही एक उत्तम शिक्षक असू शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळते. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुम्ही आक्रमक, धाडसी आणि तडफदार आहात. लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही विनाकारण इतरांची कुरापत काढतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून आपल्या विषयाची संपूर्ण माहिती तुम्हाला असते. स्वतःच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास असतो आणि ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. अनेकदा तुम्ही उतावळेपणाने नवीन नवीन योजनांमध्ये प्रवेश करतात. संभाषण कलेत तुम्ही प्रवीण आहात. तुम्हाला जीवनामध्ये अधिकार आणि मानसन्मान मिळतो. अनेकदा तुमची चूक तुम्ही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळ आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्हाला गरिबांवर दया करण्यात एक आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःच्या इच्छाशक्तीने बरे करू शकतात. तुम्ही तापट आहात मात्र स्वतःवरपोकळ दिमाख, गर्व, अहंकार, खोटा अभिमान टाळला पाहिजे तसेच इतरांवर टीका करताना शब्द काळजीपूर्वक वापरावेत. तुमच्या आयुष्यावर तुमच्या जीवनातील वैवाहिक समस्यांचा परिणाम दिसून येऊ शकतो. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी आहे. भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल तुम्हाला जबर आकर्षण असते. अंतर तुम्ही त्याबाबतीत नियंत्रण ठेवले पाहिजे. काही वेळेस तुम्ही हट्टी पणा करतात. तुमचा स्वभाव घमेंड करण्याचा असू शकतो. ते टाळले पाहिजे.
व्यवसाय:- राजकीय क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, लोखंडाशी संबंधित व्यवसाय, इंजीनियरिंग, खाण, बांधकाम, पुढारी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- तांबडा, हिरवा आणि पिवळा.
शुभ रत्न:– पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज काही विचित्र घटना घडतील. मात्र त्यातून तुमचा लाभ होणार आहे. राजकीय क्षेत्रात उलथापालथ होणार आहे. महिलांचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) तुमच्या मृदू स्वभावाला न साजेसा पराक्रम आज तुम्ही कराल. परदेश गमनाचे नियोजन कराल. पत्नीसाठी वेळ द्याल. गृहसजावट कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यवसायात भरघोस वाढ संभवते. सामाजिक कार्यात रस निर्माण होईल. कलाकारांना काहीशा निराशेला सामोरे जावे लागू शकते.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन आनंदी करणारे ग्रहमान आहे. काहीतरी भव्य दिव्य करावे असे आज तुम्हाला वाटेल. भय आणि चिंता दूर होतील. मात्र बोलताना काळजी घ्या. मौल्यवान दागिने सांभाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज भरभराट करणारा दिवस आहे. मन कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या घेईन. मात्र त्यावर काही बंधने येतील. वारसा हक्काने संपत्ती मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) तुमच्या राशीत बुध आणि सूर्य आहेत. हे अनोखे ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. चिकित्सा आणि संशोधन यात यश मिळेल. मात्र चैनीवर खर्च कराल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रतिकूल रवी आणि बुध असूनही आज तुम्ही यशस्वी वाटचाल कराल. अनुकूल शुक्र, केतू तुमच्या समस्या सोडवण्यास मदत करतील. मात्र जास्त गूढ वागणे हिताचे नाही.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. मनमोकळे वागाल. सूर्याची अनुकूलता तुम्हाला उच्च पदावर नेईन. तुमच्या कष्टाळू स्वभावाचा तुम्हाला लाभ होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज फारशी अनुकूलता नसली तरी फार अडचणी देखील नाहीत. नोकरीच्या ठिकाणी जास्त वेळ जाणार आहे. वरिष्ठ खुश असणार आहेत. भिन्न लिंगी व्यक्तीकडून एखाद्यावेळी काहीसा त्रास होऊ शकतो.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चंद्र अनुकूल आहे. सत्याच्या मार्गाने पैसे कमवा. गैर मार्ग अवलंबिल्यास आज नक्कीच त्रास होणार आहे. मोह टाळा. प्रवास घडतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज कष्ट करण्याचा दिवस आहे. त्यामानाने फळ कमी मिळणार असले तरी भविष्यातील यशाची ही सुरुवात ठरू शकते. आज तुम्हाला महिलांकडून विरोध संभवतो.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) ग्रहमान अनुकूल आहे. मन आनंदी राहील. तुमचे शत्रू आज जे काही करतील त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. आज व्यसने आणि प्रलोभने टाळा.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
