नाशिकमध्ये बाबाज थिएटरतर्फे “संगीत मैफल” आणि “कृतज्ञता सन्मान पुरस्कार” सोहळा

0

नाशिक, दि. १ ऑक्टोबर २०२५ (Nashik cultural program) नाशिकच्या ज्येष्ठ नागरिक आणि संगीतप्रेमींसाठी बाबाज थिएटरने आज विशेष सांस्कृतिक मेजवानी चे आयोजन करण्यात आले आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या या उपक्रमाचे हे ५९वे पुष्प असून, “संगीत मैफल” आणि “कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा” यांचे आयोजन गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास, कुर्तकोटी सभागृह येथे करण्यात आले.आहे. 

गझलांची रंगतदार सादरीकरणसुप्रसिद्ध गायक प्रा. आनंद अत्रे यांनी त्यांच्या “आनंद स्वर प्रस्तुत गजलें और नज्में…” या कार्यक्रमातून रसिकांना गझलांची मनमोहक मैफल सादर होणार असून . त्यांच्या खुमासदार शैलीत सादर होणार असून त्यांना ऍड. प्राजक्ता अत्रे-गोसावी यांनी साथ देणार आहेत 

हिंदीतील महान गजल गायकांच्या आठवणींसह त्यांच्या रचनांचे सादरीकरण ही उपस्थित प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरणार आहे. 

“कृतज्ञता सन्मान पुरस्कार” वितरणया कार्यक्रमात नाशिकच्या विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून पुरस्कारांचे वितरण प्रा. प्र. द. कुलकर्णी (ज्येष्ठ साहित्यिक) आणि सुधीर कावळे (ज्येष्ठ पत्रकार) यांच्या हस्ते पार पडणार आहे. 

यांचा होणार सन्मान 

मा. हेमंत गव्हाणे सांस्कृतिक क्षेत्र (सुप्रसिद्ध अभिनेते)

मा. सौ. मोना हेमराजानी सामाजिक क्षेत्र (समाजसेविका)

मा. उमेश कुंभोजकर क्रीडा क्षेत्र (क्रीडापटू)

उपक्रमाची संकल्पना(Nashik cultural program)

मा. प्रशांत जुन्नरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात आजवर ५८ कार्यक्रमांतून १७५ मान्यवरांना “कृतज्ञता सन्मान पुरस्कार” प्रदान करण्यात आले आहेत. समाज, संस्कृती आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करून या उपक्रमाने नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली आहे.

आयोजनसूत्रसंचालन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा फासे या करणार असून या उपक्रमासाठी बाबाज कैलाश पाटील, प्रा. डॉ. प्रीतिश कुलकर्णी, शामराव केदार, जे. पी. जाधव, दिलीपसिंह पाटील, योगिता पाटील, राजाभाऊ पाटेकर, मिलिंद जोशी, कल्याणी अनिता मनोहर आणि एन. देशपांडे आदींनी प्रयत्न केले.बाबाज थिएटरचा हा सांस्कृतिक उपक्रम नाशिककरांच्या कलाभिमानाला आणि सामाजिक भानाला प्रोत्साहन देणारा ठरतो. संगीताची सुरेल मैफल आणि मान्यवरांचा सन्मान या द्विगुणित आनंदामुळे आजचा कार्यक्रम अविस्मरणीय रहाणार आहे.  

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!