ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन शुक्ल दशमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज शुभ दिवस आहे” *विजयादशमी, दसरा*
चंद्र नक्षत्र – उ.षा/ (सकाळी ९.१३ नंतर) श्रवण.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज तुमच्या मनाला शांतता लाभणार आहे. चिडचिड कमी होईल. मन प्रसन्न राहील. आरोग्यात सुधारणा होईल. तुमची इच्छापूर्ती होईल. मात्र पत्नीशी वादविवाद टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सूर्याची प्रतिकुलता असली तरी आज चंद्राचा सूर्याशी शुभ योग आहे. भय कमी होईल. सरकारी व्यक्तींशी संबंध येईल. इतके दिवस असलेली बंधने आज कमी होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अष्टम स्थानी चंद्र आहे. फारशी अनुकूलता नाही. मोठे निर्णय आज घेऊ नयेत. आज मन अस्थिर राहील. चिडचिड होऊ शकते. खर्च वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज तुमच्या आवडत्या मित्रांचा सहवास मिळेल. सौख्य लाभेल. प्रवास घडतील. प्रशंसा होईल. आरोग्यात सुधारणा होईल. दर्जा वाढेल. धनप्राप्ती होईल. पोट दुखीचा त्रास जाणवेल. फसवणूक होऊ शकते.
सिंह:– (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज धनप्राप्ती होणार आहे. ग्रहमान अनुकूल आहे. आरोग्यप्राप्ती होईल. शत्रूचा नाश होईल. सुवर्ण अलंकार प्राप्त होतील. आज तुमची ऊर्जा वाढणार आहे. स्पर्धेत जय मिळेल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज फारशी अनुकूलता नाही. काही आनंददायक घटना घडतील. मात्र कामात विघ्न येऊ शकतात. अडचणी वाढतील. थकवा आल्यासारखा वाटेल. अचानक राग येणे, आत्मविश्वास कमी होणे यासारखे अनुभव येतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. विनाकारण भय वाटेल. पोटाचे विकार संभवतात. मित्रांशी वैर होऊ शकते. वरिष्ठ नाखूष होतील.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तृतीय चंद्र आहे. अर्थलाभ होईल. नवीन खरेदी होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. यशस्वी व्हाल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. कर्ज वाढेल. पायाची काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आजचा दिवस खर्चात टाकणारा आहे. वास्तूआणि जमीन संबंधित कामे मार्गी लागतील. संतती साठी एखादी खरेदी होईल. मोठ्या लोकांशी संबंध येईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज तुमच्या राशीत चंद्र आहे. चांगली बातमी समजेल. नवीन मित्र मिळतील. एखादा जवळचा नातेवाईक दूरदेशी जाईल. मात्र काही बाबतीत आज निरर्थक श्रम होतील. कष्ट वाया जातील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यय स्थानी चंद्र आहे. विनाकारण आळस येईल. इतरांच्या बद्दल ईर्षा निर्माण होईल. चिडखोरपणा वाढेल. सरकारी व्यक्तींची किंवा वरिष्ठांची नाराजी जाणवेल. प्रवास कंटाळवाणे होतील. खर्च वाढतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आनंद देणारा दिवस आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. भरभराट होईल. गैरसमज दूर होतील. मात्र एखादी छोटी जखम होऊ शकते. किंवा मानसिक पीडा देणारीएखादी बातमी येऊ शकते.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य गुरूवार, २ ऑक्टोबर २०… […]