आजचे राशिभविष्य शनिवार, ४ ऑक्टोबर २०२५
४ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन शुक्ल पंचमी/षष्ठी. विश्वावसूनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज उत्तम दिवस आहे” *शनिप्रदोष*
नक्षत्र: धनिष्ठा (मंगल)/ (सकाळी ९.१० नंतर) शततारका (राहू)
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कुंभ. (शूल योग शांती)
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
४ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर हर्षल आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. हर्षलच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात आणि तुमच्या विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. जीवनात बरेच चढउतार येतात. विलक्षण घटना घडतात. तुम्ही अत्यंत उत्साही प्रगतिशील आहात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तुम्ही तिला तोंड देऊ शकतात. तुम्ही बुद्धिमान, चतुर, शास्त्राची आवड असणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. मानव जातीच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला रूढी, परंपरा फारशा आवडत नाहीत. तसेच खोटेपणा देखील आवडत नाही. तुम्ही समाजप्रिय आहात आणि तुमच्या व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्हाला नवीन नवीन वस्तूंची तसेच प्रवासाची आवड आहे. तुम्ही डोके शांत ठेवून काम केल्यास तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तुम्ही अहंकार टाळला पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा ठामपणा असतो. आयुष्यात तुम्ही सतत बदल करत असतात. तुमचा मित्र परिवार देखील सतत बदलत असतो.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, बँकिंग, आयात निर्यात, शास्त्र, तसेच स्पेशालिस्ट डॉक्टर, संशोधन.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग:- निळा, पिवळा, नारंगी, राखाडी.
शुभ रत्न:- पोवळे, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र ग्रहमान आहे. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. मात्र निर्णय होणार नाही. काम पुढे ढकलले जाईल. सरकारी कामात दिरंगाई जाणवेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) कामाचा ताण वाढणार आहे. गुप्तशत्रूंच्या कारवाया थांबतील. विरोधक माघार घेतील. काही विचित्र घटना घडू शकतात किंव मानसिक अस्थैर्य जाणवेल. घरातील व्यक्तींशी मतभेद संभवतात.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. आज अशक्तपणा जाणवेल. खर्च वाढू शकतो. मान अपमानाचे प्रसंग येतील. वासना वाढतील. लोभ आणि मोहावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अष्टम स्थानी चंद्र आहे. अनुकूलता नाही. मात्र आर्थिक लाभ आज चांगले होणार आहेत. आरोग्याचे प्रश्न गंभीर होऊ शकतात. खर्च वाढणार आहेत. आर्थिक नियोजन चुकू शकते. पैशांची कमतरता जाणवेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सप्तम स्थानी चंद्र आहे. काही सुखद घटना घडतील. व्यवसाय वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यास चांगला कालावधी आहे. पत्नीची साथ मिळत आहे मात्र त्यासाठी आधी पत्नीला विश्वासात घेणे आवश्यक आहेत. आज काहीसे गैरसमज होऊ शकतात. आज फसवणूक होण्याची शक्यता आहे.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज व्यवसायिक लाभ उत्तम होणार आहेत. संशोधन आणि दर्जा नियंत्रण या क्षेत्रात मोठी कामगिरी कराल. सखोल अभ्यास केल्यास आज चांगले यश मिळेल. वाणीदोष टाळा. शब्द जपून वापरा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज संभ्रमात टाकणारा दिवस आहे. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य आहेत की नाहीत याचा मानसिक गोंधळ उडेल. आत्मविश्वास कमी होईल. पित्त आणि उष्णतेचे विकार यांच्यापासून काळजी घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सध्याचा कालावधी खर्च आणि कर्जे वाढवणारा आहे. सावधपणे वाटचाल करा. सामाजिक कामात आणि राजकारणात अपेक्षित यश आणि नावलौकिक मिळणार नाही. सूर्याची अनुकूलता आज कमी जाणवेल. बुध देखील आता व्यय स्थानी आले आहेत. शत्रू वाढवू नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल ग्रहमान आहे. चंद्र आज तुम्हाला धाडसी आणि पराक्रमी निर्णय घेण्यास भाग पाडेल. प्रिय मित्र भेटतील. नवीन ओळखी होतील. मात्र तुमच्यातील जबरदस्त ऊर्जा अडचणींवर मात करेन.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) द्वितीय चंद्र आहे. संमिश्र ग्रहमान आहे. आज तुमच्या हातून काही दुरवर्तन होणार नाही याची काळजी घ्या. प्रयत्न कमी पडू देऊ नका.; आज आत्मविश्वास कमी होणार आहे. अचानक नैराश्य येऊ शकते. देवी उपासना केल्यास यावर मात करू शकाल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. त्याचा मंगळाशी शुभ योग आहे. मंगळ नवम स्थानी तूळ राशीत आहे. आज नवीन खरेदी होईल मात्र नंतर तीच खरेदी केलेली वस्तू तुम्हाला फारशी पसंत पडणार नाही. फसवणूक होण्याची शक्यता आहे. सूर्याची नाराजी आहे हे लक्षात ठेवा. स्वभाव चिडचिड होऊ शकतो. सरकारी अवकृपा होऊ शकते.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यय स्थानी चंद्र आहे. त्यातच अष्टम स्थानी मंगळ आहे. आज अनुकूलता नाही. काळजीपूर्वक पावले उचलली पाहिजेत. आरोग्याच्या बाबतीत आज निराश होणार आहे. प्रवासात त्रास संभवतो. मोठे संकट थोडक्यात टळू शकते. कुलदेवतेची उपासना करा.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
