ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अश्विन कृष्ण षष्ठी विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
राहुकाळ: संध्याकाळी ४.३० ते ६.००
दिशाशूल: उत्तर दिशा
मेष:
आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. नव्या कल्पना सुचतील आणि त्यांचा उपयोग केल्यास यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवास योग आहे.शुभ रंग: लालशुभ अंक: १
वृषभ:
आर्थिक निर्णय घेताना संयम बाळगा. कुटुंबातील वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळी मन प्रसन्न होईल.शुभ रंग: पांढराशुभ अंक: ६
मिथुन:
नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. शिक्षण आणि नोकरीत प्रगतीचा मार्ग खुलेल. संवादातून तणाव मिटवता येईल.शुभ रंग: हिरवाशुभ अंक: ५
कर्क:
घरगुती कामांमध्ये व्यस्तता राहील. एखादी शुभ वार्ता मिळू शकते. पैशाचे नियोजन उत्तम करा. मित्रांचा पाठिंबा लाभेल.शुभ रंग: चंदेरीशुभ अंक: २
सिंह:
कामात धैर्य आणि आत्मविश्वास ठेवा. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.शुभ रंग: सोनेरीशुभ अंक: ३
कन्या:
दिवस सामान्य आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत मतभेद टाळा. परिश्रमाचे फळ लवकरच मिळेल.शुभ रंग: निळसरशुभ अंक: ७
तुळ:
कलात्मक क्षेत्रात यश मिळेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. सामाजिक कार्यक्रमात सहभाग लाभदायक ठरेल.शुभ रंग: गुलाबीशुभ अंक: ४
वृश्चिक:
आज काही कठीण निर्णय घ्यावे लागतील, पण त्याचा फायदा पुढे होईल. प्रवास यशस्वी होईल. गुप्त शत्रूपासून सावध राहा.शुभ रंग: जांभळाशुभ अंक: ८
धनु:
धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा फायदा होईल. जुने अडथळे दूर होतील.शुभ रंग: पिवळाशुभ अंक: ९
मकर:
नोकरीत बदलाचे संकेत. मेहनतीमुळे वरिष्ठांचे मन जिंकाल. आर्थिक लाभ होईल. आरोग्य सुधारेल.शुभ रंग: करडाशुभ अंक: ५
कुंभ:
मित्रांसोबत वेळ छान जाईल. व्यवसायात वाढीची शक्यता. निर्णय घेताना भावनांपेक्षा व्यवहारिकता ठेवा.शुभ रंग: आकाशीशुभ अंक: २
मीन:
नवीन कामाची सुरुवात होईल. घरात आनंदाचे वातावरण. मनातील गोंधळ दूर होईल. प्रवास शुभ.शुभ रंग: केशरीशुभ अंक: ६
१२ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:(Marathi Rashi Bhavishya)
तुमच्यावर सूर्य आणि चंद्र यांचा प्रभाव आहे. तुम्ही स्वाभिमानी, आत्मविश्वासू आणि नेतृत्वगुण असणारे आहात. तुम्हाला प्रसिद्धी आणि कीर्तीची आवड असते. तुम्ही कामात परिपूर्णता शोधता आणि जबाबदारी स्वीकारायला तयार राहता.
भावनिक पण व्यावहारिक स्वभावामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. तुम्ही उदार, मदतनीस आणि कार्यतत्पर आहात. कुटुंबात प्रेमळ वातावरण निर्माण करता. तुम्हाला कला, संगीत, आणि अध्यात्म यांची आवड असते.
व्यवसाय: प्रशासन, अध्यापन, कला, राजकारण, वैद्यकीय क्षेत्र, लेखन.शुभ दिवस: रविवार, सोमवार, गुरुवार.शुभ रंग: सोनेरी, पिवळा, पांढरा.शुभ रत्न: माणिक आणि मोती.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

[…] आजचे राशिभविष्य रविवार, १२ ऑक्टोबर २०… […]