
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक कृष्ण द्वितीया. विश्वावसुनाम संवत्सर, शके १९४७, संवत २०८१
चंद्र – वृषभ राशीत, रोहिणी नक्षत्रात
राहुकाळ – सकाळी १०.३० ते १२.०० ((Marathi Rashi Bhavishya))
मेष: आनंददायी दिवस. घरात उत्साह व सणाचा माहोल. कामात प्रगती, आर्थिक लाभ. दुपारनंतर शुभ बातमी मिळू शकते.
वृषभ: कुटुंबात ऐक्य आणि सौहार्द वाढेल. दैनंदिन कामात गती. आरोग्य उत्तम राहील. सायंकाळी दीपदान लाभदायक.
मिथुन: आज विशेष शुभ दिवस. नवे उपक्रम राबवण्यासाठी उत्तम काळ. मित्रमंडळींशी आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
कर्क: आज थोडा खर्चिक दिवस असला तरी मन प्रसन्न राहील. सजावट, खरेदी आणि पूजा यासाठी शुभ वेळ. आत्मिक समाधान मिळेल.
सिंह: समाजात प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून सहकार्य. कार्यक्षेत्रात प्रशंसा. सायंकाळी स्नेहसंमेलनाचा आनंद.
कन्या: भाग्यवृद्धीचा दिवस. प्रवास, व्यवसाय व शिक्षणात यश. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दिवाळीपूर्वी आनंददायी घडामोडी.
तूळ: आर्थिकदृष्ट्या लाभदायक वेळ. नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळतील. मित्र व कुटुंबीयांशी संवाद वाढेल. आरोग्य चांगले.
वृश्चिक: जोडीदारासोबत सुसंवाद वाढेल. भागीदारीतील निर्णय अनुकूल. प्रतिष्ठा वाढेल. घरात शुभ कार्याचे योग.
धनु: आरोग्याची थोडी काळजी घ्या. कामात सातत्य ठेवा. दुपारनंतर स्थिती सुधारेल. अध्यात्मिक कार्यात रस वाढेल.
मकर: सर्जनशीलतेचा आणि आनंदाचा दिवस. प्रेमसंबंध व कुटुंबात आनंद वाढेल. मुलांशी संबंधित शुभ बातमी मिळेल.
कुंभ: घरगुती वातावरणात उल्हास. स्थावर मालमत्तेचे काम पुढे सरकेल. दिवाळीपूर्व साफसफाई आणि सजावटसाठी उत्तम दिवस.
मीन: प्रवास योग शुभ. सणाच्या तयारीत व्यस्त राहाल. आर्थिक बाबतीत समाधान. सायंकाळी दीपदानाने सकारात्मक ऊर्जा लाभेल.
आजचा शुभ रंग: रुपेरी (चांदीसारखा)
आजचा मंत्र: “ॐ नमो भगवते वासुदेवाय”
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)




[…] […]
[…] […]