
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
कार्तिक कृष्ण षष्ठी विश्वावसुनाम संवत्सर – शके १९४७ – संवत २०८१
चंद्र – मिथुन आणि कर्क राशीत.
आज उत्तम दिवस आहे.
नक्षत्र – पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्र
राहुकाळ – सकाळी ७.३० ते ९.०० (Marathi Rashi Bhavishya)
मेष (Aries)चंद्र कर्क राशीत असल्याने भावनिकतेचा प्रभाव राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, पण प्रेमळ वातावरण राहील. घरगुती कामात यश. उपाय: सोमवारी शिवलिंगावर दूध व जल अर्पण करा.
वृषभ (Taurus)व्यवसायात प्रगती होईल. मित्रांकडून सहाय्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वाहन खरेदीचे योग. उपाय: पार्वती मातेची पूजा करा व चांदी धारण करा.
मिथुन (Gemini)कुटुंबीयांमध्ये संवाद सुधारेल. खर्च वाढेल पण समाधान लाभेल. आत्मविश्वासाने काम करा. उपाय: विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.
कर्क (Cancer)चंद्र दुपारी तुमच्या राशीत येत असल्यामुळे दिवस उत्तम. कामात प्रगती होईल, आत्मविश्वास वाढेल. प्रवास लाभदायक. उपाय: चंद्राला कच्चे दूध अर्पण करा.
सिंह (Leo)शांतता राखा. थकवा जाणवेल. अनावश्यक वाद टाळा. संध्याकाळी चांगली बातमी मिळू शकते. उपाय: सूर्य व शिव दोघांची संयुक्त पूजा करा.
कन्या (Virgo)आर्थिक लाभाचे योग. मित्रपरिवाराचा सहवास आनंददायी. कार्यक्षेत्रात नवी ओळख होईल. उपाय: श्रीविष्णूला पिवळे फुल अर्पण करा.
तुला (Libra)वरिष्ठांकडून कौतुक. सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल. घरात शुभ प्रसंग. उपाय: लक्ष्मीपूजन करा आणि चांदीत जल ठेवा.
वृश्चिक (Scorpio)धनप्राप्तीचा योग. जुनी देणी मिळतील. प्रवास लाभदायक. आरोग्य सुधारेल. उपाय: हनुमानाला सिंदूर व केळी अर्पण करा.
धनु (Sagittarius)धार्मिक कार्यासाठी योग्य दिवस. मन शांत व स्थिर राहील. सन्मान व यश मिळेल. उपाय: पिवळ्या कपड्यांत विष्णू पूजन करा.
मकर (Capricorn)नोकरीत परिश्रम वाढतील, पण फळ मिळेल. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. संध्याकाळी विश्रांती घ्या. उपाय: शनिदेवाला काळे तीळ व तेल अर्पण करा.
कुंभ (Aquarius)नवीन संधी मिळतील. जोडीदाराचा आधार लाभेल. सामाजिक मान वाढेल. उपाय: शिवलिंगावर पांढरे पुष्प अर्पण करा.
मीन (Pisces)धार्मिक भावना जागृत होतील. प्रवास यशस्वी ठरेल. विद्यार्थ्यांना उत्तम यश. उपाय: भगवान विष्णूला खीर अर्पण करा.
“जिथे श्रद्धा आणि संयम असतो, तिथे सर्व संकटे लहान भासतात.”
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)



