नाशिक इन हॉटेलवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई

एम.डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणारे तिघे आरोपी जेरबंद, २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

नाशिक, दि. ९ नोव्हेंबर २०२५ Nashik Crime News नाशिक शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिक इन हॉटेलमध्ये एम.डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणाऱ्या तिघा युवकांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २,२३,३८० किमतीचा मुद्देमाल, त्यात १.६० लाख किमतीचा ३२ ग्रॅम एम.डी. पावडर जप्त केली आहे.

पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, त्यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने नाशिक इन हॉटेल (रूम नं. ३०५) येथे शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत खालील आरोपींना अटक करण्यात आली

1️⃣ शोएब मुराद खान (वय ३९, रा. हॅपी कॉलनी, वडाळा, नाशिक)

2️⃣ शेख मुस्तफा अफजल (वय १९, रा. खोडेनगर, नाशिक)

3️⃣ मोफीज मुज्जमील खान (वय १९, रा. वडाळा चौक, नाशिक)

पोलिस चौकशीत आरोपी शोएब खानने सांगितले की, नाशिक इन हॉटेलचा मालक कपील देशमुख याने त्यांना एम.डी. (मॅफेड्रॉन) विक्रीसाठी हॉटेलमधील रूम उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे चौघांवर एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Nashik Crime News) या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५०५/२०२५ नोंदविण्यात आला असून, एन.डी.पी.एस. कायदा १९८५ च्या कलम ८(क), २२(क), २५, २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही धडक कारवाई मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त; मा. श्री. किरणकुमार चव्हाण, उप आयुक्त (गुन्हे) आणि सहा. पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी वपोनि सुशिला कोल्हे, वपोनि जितेंद्र सपकाळे (नाशिक रोड पो. स्टे.), वपोनि जयंत शिरसाठ (उपनगर पो. स्टे.) यांनी नेतृत्व केले. तसेच सपोनि सत्यवान पवार, सपोनि सचिन चौधरी, सपोनि विशाल पाटील, आणि इतर अधिकाऱ्यांनी मिळून ही कारवाई यशस्वी केली.

या कारवाईमुळे नाशिक शहरात वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी आणखी एक मोठा घाव घातला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या नेटवर्कमधील इतर संबंधितांचीही माहिती घेतली जात आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!