
मुंबई, दि. ११ नोव्हेंबर २०२५ – Dharmendra Health Update बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या प्रकृतीविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आलं आहे. काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवल्या गेल्या, ज्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र, आता धर्मेंद्र यांची कन्या ईशा देओल (Esha Deol) हिनं स्वतः पुढे येत या अफवांचं खंडन करत दिलासादायक माहिती दिली आहे.
ईशानं इन्स्टाग्रामवर एक अधिकृत पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की,(Dharmendra Health Update)
“माझे वडील जिवंत आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारतेय. आम्ही सर्वांना आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो. माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार.”
या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी “गॉड ब्लेस धर्मेंद्र”, “गेट वेल सून हीमॅन”, अशा कमेंट्स करत त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
धर्मेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी तब्येतीची तक्रार असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देओल कुटुंबीयांकडून सातत्याने त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती शेअर केली जात आहे.
ईशा देओलच्या पोस्टमुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला असून, तिच्या या प्रामाणिक प्रतिक्रियेनं अफवांना पूर्णविराम मिळालाय.
बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र आजही लाखो चाहत्यांच्या हृदयात घर करून आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची ही बातमी चाहत्यांसाठी आनंदाची ठरली आहे.
View this post on Instagram


