नाशिकच्या गंगापूर रोडवर बिबट्याची दहशत! बिबट्याच्या हल्ल्यात ३ जण जखमी

दोन परिसरांमध्ये हाईअलर्ट, पोलिस–वनविभागाची संयुक्त मोहीम सुरू

0

नाशिक,दि,१४ नोव्हेंबर २०२५ – Nashik Leopard News शहरातील गंगापूर रोड परिसर आज, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी अक्षरशः धक्कादायक घटनांनी हादरला. दुपारी नागरी वस्तीत बिबट्या घुसल्याची माहिती मिळताच नागरिकांनी भीतीने धावाधाव केली. झोपडपट्टी तसेच निवासी वसाहतींमध्ये या वन्यप्राण्याचे दर्शन झाल्याने प्रशासनाने तत्काळ हाईअलर्ट घोषित केला आहे.बिबट्याने ३ नागरिकांवर हल्ला केला आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अचानक बिबट्याची एन्ट्री, परिसरात गोंधळ (Nashik Leopard News)

संत कबीरनगर झोपडपट्टी आणि वन विहार कॉलनी या दोन्ही भागांमध्ये बिबट्याचे फिरणे स्पष्ट झाले आहे. काही नागरिकांनी तर दोन बिबटे असल्याचा संशय व्यक्त केला असून एक बिबट्या वस्तीत शिरला तर दुसरा झाडीत अदृश्य झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही नागरिक जखमी

प्राथमिक अहवालांनुसार, बिबट्याने २ ते ३ नागरिकांवर हल्ला केला आहे. जखमी नागरिकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

👮 युद्धपातळीवरील मोहीम पोलिस व वनविभाग तैनात

घटनेची माहिती मिळताच पोलिस व वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

सध्या खालील उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत:

बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवले

पिंजरे लावण्यात आले

तज्ज्ञांची विशेष टीम तैनात

रात्रीही सतत गस्त

परिसरातील सर्व प्रवेशद्वारे बंद

⚠️ नागरिकांसाठी अत्यावश्यक सूचना

नाशिक पोलिस आणि वनविभागाने नागरिकांना खालील सूचना दिल्या आहेत:

रात्री किंवा कमी प्रकाशात झाडी, मोकळी मैदाने किंवा एकांत भागात फिरू नये

बिबट्याचे दर्शन, आवाज किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास 112 किंवा वनविभागाच्या हेल्पलाइनवर त्वरित संपर्क

फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी जवळ जाण्याचा धोका टाळावा

पालकांनी मुलांना बाहेर न पाठवण्याचे व सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन

📌 परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सतर्क

वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित असून बिबट्याचा ठावठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे गंगापूर रोड परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

नागरी वस्तीमध्ये वन्यप्राण्यांचे शिरकाव वाढत असल्याने नाशिककरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले असले तरी, नागरिकांनी अधिक सतर्क राहून सहकार्य करणे अत्यावश्यक आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!