ब्रेकिंग न्यूज – ठाण्यात भाजप–शिंदे गटामध्ये राडा!

भाजपाच्या माजी नगरसेवकाकडून मारहाण, राजकीय तापमान चढलं

0

ठाणे, दि. २१ नोव्हेंबर २०२५ Thane Political Clash राज्यातील सत्ताधारी महायुतीत सुरू असलेलं नाराजीचं नाट्य आता रस्त्यावर उतरल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळाले. भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

🔥 काय घडलं मध्यरात्री ठाण्यात?(Thane Political Clash)

बीएसयूपी घरांसाठी शंभर रुपयांची नोंदणी फी लागू करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी पाच पाखाडी विभागातील लक्ष्मीनारायण इमारतीत शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख हरेश महाडीक आणि उपविभागप्रमुख महेश लहाने हे कर्मचाऱ्यांसह सेलिब्रेशनची तयारी करत होते.याचवेळी अचानक भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार घटनास्थळी दाखल झाले. “येथे तुम्ही कशाच्या आधारे सेलिब्रेशन करता?” अशा स्वरूपाच्या कथित वादातून संतापून पवार यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.घटनानंतर हरेश महाडीक आणि महेश लहाने यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी एनसी नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

ठाण्यातील शिवसेनाभाजप वाद चिघळतोय?

नारायण पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही. मात्र या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटातील नाराजी आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक पातळीवरील भाजपशिवसेना संघर्ष आता उघडपणे धगधगू लागल्याचे जाणवत आहे.

🛑 दिल्लीतील मोठी तक्रार: एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे धाव!

राज्यातील मंत्र्यांच्या नाराजीनंतर १९ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ‘ऑपरेशन लोटस’सदृश हालचालींबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शिंदेंनी अनेक माजी नगरसेवक फोडून भाजपने त्यांची संघटना कमकुवत केल्याची तक्रारही शाहांकडे केल्याची चर्चा रंगली आहे.

🟡 पुढे काय?

ठाण्यातील मारहाण प्रकरणामुळे दोन्ही पक्षांतील तणाव वाढण्याची चिन्हे तीव्र,आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दोन्ही पक्ष आता अधिक आक्रमक भूमिकेत,शिंदेचव्हाण संघर्षामुळे महायुतीत नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!