
नाशिक, दि. २२ नोव्हेंबर २०२५– AIMA INDEX-25 Nashik नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे येत्या २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान आयोजित होणाऱ्या आयमा इंडेक्स–२५ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाच्या जागेचे भूमिपूजन त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे आज विधिवत पार पडले. मंत्रोच्चार, मान्यवरांची उपस्थिती आणि पारंपरिक मंगल विधी यामुळे समारंभाचे वातावरण अधिक भारावून गेले.
या औद्योगिक महाकुंभाला भव्य-दिव्य करण्याचा निर्धार आयोजकांनी यावेळी व्यक्त केला. या प्रदर्शनातून नाशिकच्या उद्योगक्षेत्राला, निर्यातीला आणि नवउद्योजकांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

(AIMA INDEX-25 Nashik ) समारंभाला एनएमआरडीएचे आयुक्त जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, तसेच दीपक चंदे (दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर आयमा अध्यक्ष ललित बूब, सरचिटणीस प्रमोद वाघ, चेअरमन वरुण तलवार, निखिल पांचाळ, राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, योगिता आहेर, हर्षद बेळे अशा मान्यवरांची उपस्थिती होती.
महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी नाशिकच्या निर्यात-वाढीसाठी आणि गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी आयमा इंडेक्ससारख्या कार्यक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. “नाशिकचे स्थायी औद्योगिक प्रदर्शन केंद्र लवकरच साकारेल,” असा उल्लेख करत त्यांनी आगामी प्रदर्शन शासनाच्या संयुक्त विद्यमाने अधिक भव्य करण्याची तयारी दर्शवली.
एनएमआरडीए आयुक्त जलज शर्मा यांनी उद्योजकांच्या सहकार्याची गरज अधोरेखित करत, “मेट्रोपॉलिटन क्षेत्राचा विकास आराखडा तयार होत आहे. उद्योजकांनी त्यात आपले योगदान द्यावे,” असे आवाहन केले.आयमा अध्यक्ष ललित बूब यांनी प्रदर्शनाचे दोन दशके पूर्ण झाल्याचा उल्लेख करत, “दरवेळी नवनवीन संकल्पना घेऊन येणारे आयमा प्रदर्शन यावेळीही अत्यंत भव्य होईल,” असा विश्वास व्यक्त केला.
प्रदर्शनाचे चेअरमन वरुण तलवार यांनी सांगितले की, सर्व स्टॉल्स बूक झाले असून उद्योजकांच्या मागणीनुसार अतिरिक्त स्टॉल्स उभारणीचे काम सुरू आहे. या महाकुंभात विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने प्रदर्शन अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यास निमाचे अध्यक्ष आशिष नहार,माजी अध्यक्ष धनंजय बेळे, चेंबर चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे,माजी अध्यक्ष संतोष मंडलेच्या, हेमंत राठी, विक्रम सारडा,शोभना बूब,आयमाचे संस्थापक अध्यक्ष भास्कर कोतवाल, माजी अध्यक्ष जे.एम.पवार, रमेश पवार, जे.आर.वाघ, विवेक पाटील, राजेद अहिरे,निवेकचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, राजा जॉली, लघुद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया एमआयडीसीचे जे.पी.पवार,वृषाली सोनी,
दिलीप वाघ,रवींद्र महादेवकर,श्रीलाल पांडे, रवी शामदासांनी, अलोक कनांनी, करनसिंग पाटील, रणजीत सानप, हेमंत खोंड, संजय महाजन,अभिषेक व्यास,धीरज वडनेरे,योगेश जोशी, यशवंत वाघ हेमंत पाटील, विनोद कुंभार, जयंत पगार, अविनाश मराठे, कुंदन डरंगे, कमलेश उशीर, वेदांत राठी, अविनाश बोडके निवृत्ती गाजरे आदी उपस्थित होते.
व्यासपीठावर आयमा अध्यक्ष ललित बूब,सरचिटणीस प्रमोद वाघ,बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे,आयमा इंडेक्सचे चेअरमन वरूण तलवार,आयपीपी निखिल पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,उमेश कोठावदे, योगिता आहेर,हर्षद बेळे,गोविंद झा,मनीष रावल चेंबर ऑफ कॉमर्स पदाधिकारी, उद्योगक्षेत्रातील दिग्गज, माजी आयमा अध्यक्ष, लघुद्योग भारतीचे प्रतिनिधी, MIDC अधिकारी यांच्यासह अनेक उद्योजकांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद वाघ यांनी केले.


