
नाशिक दि, ६ डिसेंबर २०२५ – Tapovan Controversy आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 (Kumbh Mela 2027) पूर्वतयारीचा वेग वाढत असतानाच नाशिकच्या तपोवन परिसरातील १८०० झाडांच्या संभाव्य वृक्षतोडीने मोठे वादंग निर्माण केले आहे. प्रस्तावित साधूग्राम (Sadhugram Project) उभारण्यासाठी ११५० एकर जागेवर झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना, त्यातही विविध पक्षांचे नेते आणि कलावंत आक्रमक झाले आहेत.या सर्व विरोधी वातावरणात आता शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एका नाशिकच्या बिल्डरच्या व्हिडीओचा दाखला देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
“तपोवन साफ करायचंय… पण भाजपला अगदी ‘साफ’ करूनच टाकायचं आहे!” – आदित्य ठाकरे
पर्यावरण रक्षा मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले:“आज आपण स्वच्छता मोहीम राबवतोय, पण हीच जागा भाजपला पूर्णपणे साफ करून टाकायची आहे!”तपोवनमध्येच साधुग्राम का उभारायचा? यावर त्यांनी ठोस प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी नाशिकच्या एका बिल्डरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक संवेदनशील मुद्दा मांडला आहे—ग्रीन झोनला यलो झोनमध्ये बदलून जंगलाला रेसिडेन्शिअल झोन करता येईल, तसेच TDR चा वापर करून जमिनीची किंमत वाढवता येईल, असे सूचक बोलणे त्या बैठकीत झाल्याचा दावा बिल्डरने व्हिडीओत केला होता.या व्हिडीओमध्ये बिल्डरच्या बाजूला बसलेले व्यक्ती नाशिक भाजपचे खजिनदार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
म्हणूनच त्यांनी सवाल उचलला —“हा साधूंचा नाही, तर TDR आणि खजिन्याचा खेळ आहे का?”यानंतर शहरात हा बिल्डर नेमका कोण? याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.“तपोवन आम्हाला हवं… साधुग्रामही हवं… पण बिल्डर-राजवट नको!”पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले:“नाशिक महानगरपालिका जर ह्यांच्या हातात गेली, तर संपूर्ण नाशिक विक्रीला काढतील हे स्पष्ट आहे!”त्यांनी असा आरोपही केला की, वृक्षतोडीवर स्थगिती मिळूनही भाजपची बिल्डर-राजवट 700 झाडे कापण्याची धमकी देत आहे.
आदित्य ठाकरे स्पष्ट शब्दांत म्हणाले:(Tapovan Controversy)
“आम्हाला साधुग्राम हवा आहे. तपोवनही हवा आहे. पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी आम्ही चालू देणार नाही.”..
परिस्थिती का गंभीर?
११५० एकरांवर साधुग्रामचे नियोजन
१८०० झाडांची संभाव्य तोड
ग्रीनझोन–यलो झोन बदलाची चर्चा
TDR रूपी नफ्याचा खेळ असल्याचा आरोप
पर्यावरणप्रेमी, राजकीय पक्ष, कलाकारांचा जोरदार विरोध
तपोवन परिसर नाशिकसाठी नैसर्गिक फुफ्फुस मानला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. त्यामुळेच वृक्षतोडीला तीव्र विरोध वाढत आहे.
तपोवन…
आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली! पण जी जागा आपण स्वच्छ करत आहोत, ती भाजपला अगदी ‘साफ’ करून टाकायची आहे.
तपोवनमध्येच का नेमका साधुग्राम?
एक व्हिडीओ नाशिकच्या एका बिल्डरने शेअर काही दिवसांपूर्वी केला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असं सुचवलं गेलं की… pic.twitter.com/OuOtG4tGNN
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 6, 2025



