
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
मार्गशीर्ष अमावस्या. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२. दक्षिणायन,
हेमंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज अमावस्या , वर्ज्य दिवस आहे. दर्श – वेळा अमावस्या.
चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा/ मूळ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक/धनु. (शूल योग, चतुष्पाद करण – दोन्ही अशुभ)
१९ डिसेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुम्ही अत्यंत उत्साही, धाडसी, पराक्रमी आणि जोशपूर्ण आहात. तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त मदत तुम्ही इतरांना करतात. इतरांचे गुपित तुम्ही कधीही फोडत नाहीत त्यामुळे तुम्ही विश्वासू आहात. उच्च प्रतीचा अभ्यास तसेच शोध प्रबंध यातून चांगली प्रगती होते. कोणताही विषय तुम्ही पद्धतशीरपणे हाताळू शकतात. क्रीडा आणि संगीत याच्यात तुम्हाला प्रावीण्य मिळते. झटपट निर्णय घेणे हे तुमचे वैशिष्ट्य आहे. अति उत्साही स्वभावामुळे तुमचं प्रेमप्रकरणात अपयश येते. स्वतंत्र बाणा आणि दुराग्रही वृत्ती यामुळे इतरांबरोबर काम करणे तुम्हाला अवघड होते. तुम्ही बोलण्यापेक्षा लिखाणातून अधिक चांगले व्यक्त होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही एक चांगले लेखक म्हणून मान्यता पावतात. लहानपणी तुम्हाला सर्व संधी मिळतात. तुम्हाला एकाग्रता साधत नाही त्यामुळे शिक्षणात व्यत्यय येतो. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. इतर लोकांना तुम्ही अनाकलनीय वाटतात.
व्यवसाय:– कोणत्याही विभागाचे प्रमुख, शल्यचिकित्सक, विद्युत, संशोधक, कार्यकारी संचालक, डेकोरेशन, वृत्तपत्र यातून लाभ होतात.
आरोग्य:– डोळ्यांचे विकार, अतिश्रम, पचनक्रिया यापासून सावध राहा.
शुभ दिवस:– सोमवार, रविवार, गुरुवार.
शुभ अंक:– 1, 4, 7.
शुभ रंग:- सोनेरी.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र युती शुक्र अष्टम स्थानी आहे. अचानक धनलाभ होईल. पत्नीकडून लाभ मिळतील. मात्रअनैतिक पैशांचे आकर्षण टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) -सप्तम स्थानी चंद्र शुक्र युती आहे. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. मने जुळतील. खर्चात वआधी संभवते. आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत. शत्रूत्रास जाणवेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. आर्थिक लाभ होतील. मानसिक सौख्य लाभेल. आर्थिक आवक चांगली असणार आहे. कामाचा ताण वाढेल. अचानक एखादा खर्च सामोरा येईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पंचम स्थानी चंद्र शुक्र युती आहे. प्रेमात यश मिळेल. विवाहाचे बेत पुढे सरकतील. आर्थिक लाभ होतील. लॉटरी लागण्याचे योग आहेत.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रगतीचा दिवस आहे. चांगली बातमी समजेल. प्रवास कार्यसाधक होतील. घरगुती कामे आणि ग्रह सजावट यात लक्ष घालावे लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्रगती उत्तम होणार आहे. घरगुती समस्या सोडवाल. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. समस्या चटकन सोडवाल. तांत्रिक क्षेत्रात प्रगती होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सुरुवात चांगली होणार आहे. प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती होईल. कलाकारांना उत्तम दिवस आहे. भौतिक सुखे प्राप्त होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. भागीदारी व्यवसायात मात्र वादविवाद संभवतात. संततीची काळजी वाटेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्चात वाढ संभवते. व्यसने आणि प्रलोभने टाळा. घरगुती वाद संभवतात. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहमान आहे. सर्व प्रकारचे लाभ होतील अमावस्या असली तरी तुमच्या आनंदाला उधाण येईल. स्तुती होईल. मित्र मंडळींकडून लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज कामासाठी समर्पित होण्याचा दिवस आहे. जितके कष्ट कराल तितके फळ मिळेल. संभाषण चातुर्य कामी येईल. घरगुती वाद टाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कुलदेवतेची पूजा केल्यास आज विशेष फळ मिळेल. प्रवास घडतील. संध्याकाळ नंतर महत्वाचे निर्णय घेऊ नयेत. चंद्राचा शनिशी केंद्र योग होत आहे.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)





[…] आजचे राशिभविष्य शुक्रवार, १९ डिसेंबर… […]