कुंभमेळ्यानंतर नाशिकच्या रिअल इस्टेटच्या खरेदीत मोठी वाढ होणार -आयुक्त शेखर सिंह
नरेडको नाशिक आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’चे दिमाखदार उद्घाटन: १८ ते २१ डिसेंबरदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर भव्य गृहप्रदर्शन

नाशिक, दि. १८ डिसेंबर २०२५ –Homethon Property Expo 2025 नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि बहुप्रतीक्षित मानला जाणारा नरेडको नाशिक आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ चा आज डोंगरे वसतिगृह मैदानावर भव्य आणि दिमाखदार शुभारंभ झाला. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर विकास प्राधिकरण (NMRDA) आयुक्त जलज शर्मा आणि बीएसएनएलचे महाप्रबंधक सारंग मांडवीकर यांच्या हस्ते फीत कापून या गृहप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, डॉ. विजय काकतकर, उदय शहा, दीपक चंदे, राजू शाह,विराज शाह, मौलिक दवे, विकास काला, हितेश ठक्कर यांच्यासह नरेडको नाशिकचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चार दिवस नाशिककरांसाठी मोफत खुले (Homethon Property Expo 2025)
१८ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे भव्य गृहप्रदर्शन सकाळी १० वाजेपासून नाशिककरांसाठी पूर्णतः मोफत खुले राहणार आहे. प्रदर्शनासाठी भव्य स्वरूपाचे आकर्षक डोम्स उभारण्यात आले असून, नामांकित आणि विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिकांचे सुसज्ज व प्रशस्त स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत. घर खरेदी, गुंतवणूक, प्लॉट, फ्लॅट, दुकाने तसेच रिअल इस्टेटमधील नव्या ट्रेंड्सची माहिती नागरिकांना एकाच छताखाली मिळणार आहे.
कुंभमेळ्यानंतर रिअल इस्टेटला मोठी चालना – शेखर सिंह
उद्घाटनप्रसंगी बोलताना सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “माझी अनेक ठिकाणी बदली झाली आहे; मात्र नाशिकचे वातावरण आणि हवेची गुणवत्ता मला व माझ्या पत्नीला अत्यंत आवडली आहे. नाशिक हे महाराष्ट्राचे स्पिरिच्युअल कॅपिटल आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित होणार आहेत.”ते पुढे म्हणाले, “प्रयागराज येथे कुंभमेळ्यानंतर रिअल इस्टेट क्षेत्रात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये कुंभमेळ्यानंतर ३० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे नाशिकच्या रिअल इस्टेटसाठी हा सुवर्णकाळ आहे.”नरेडकोच्या ‘हरित नाशिक’ संकल्पनेचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, “फक्त वृक्ष लागवड नव्हे, तर ती जगवण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. नाशिकची एअर क्वालिटी टिकवण्याची जबाबदारी येथील बांधकाम व्यावसायिकांवर आहे. पर्यावरणपूरक प्रकल्पांवर अधिक भर दिला पाहिजे.”
नरेडको हे नाशिकसाठी आकर्षण – जलज शर्मा
नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले, “नरेडको नाशिक आयोजित हे माझे तिसरे प्रदर्शन आहे. नरेडकोने कमी बजेटपासून लक्झरी प्रोजेक्टपर्यंत सर्व स्तरांतील ग्राहकांचा विचार करून विविध प्रकल्प उपलब्ध करून दिले आहेत. एनएमआरडीए नाशिकच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. येणारा काळ नाशिकसाठी सुवर्णकाळ असणार आहे.”
पर्यावरणपूरक विकासावर भर – लीना बनसोड
आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी आपल्या भाषणात सांगितले, “नाशिकचा विकास झपाट्याने होत आहे. मात्र विकासासोबतच पर्यावरण संवर्धन तितकेच महत्त्वाचे आहे. नरेडकोने शबरी स्टॉलला मोफत जागा उपलब्ध करून दिली असून येथे पर्यावरणपूरक वस्तूंची विक्री होत आहे. नागरिकांनी या स्टॉलला अवश्य भेट द्यावी.”
हरित नाशिक’ ही यंदाची खास ओळख
यंदाच्या होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचे वैशिष्ट्य म्हणजे ‘हरित नाशिक’ ही संकल्पना. नरेडको नाशिकच्या माध्यमातून प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकामागे एक वृक्ष लावण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. एक नोंदणी – एक वृक्ष या संकल्पनेनुसार नाशिक शहर व परिसर अधिक हिरवागार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.नरेडको नाशिकचे अध्यक्ष सुनील गवादे यांनी सांगितले, “होमेथॉन १ आणि २ च्या यशानंतर होमेथॉन ३ नवीन व अधिक प्रभावी संकल्पनांसह सादर करण्यात आला आहे. सुमारे ५० हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.”
मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी माहिती दिली की, “यंदा १०० टक्के स्टॉल बुकिंग झाले आहे. 4.99% ही यंदाची महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. वृक्षारोपणासोबतच त्या वृक्षांचे संगोपनही केले जाणार आहे.”
पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोला पहिल्याच दिवशी जवळपास ५ हजार नागरिकांनी भेट दिली. तसेच ऑन-द-स्पॉट प्लॉट, फ्लॅट आणि दुकाने मिळून ४० बुकिंग्स झाली. प्रत्येक बुकिंगधारकाला नरेडकोतर्फे १० ग्रॅम चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आले.
ब्रँड अॅम्बेसिडर अभिनेत्री श्रुती मराठेची आज उपस्थिती
‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ची ब्रँड अॅम्बेसिडर असलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रुती मराठे आज सायंकाळी प्रदर्शनस्थळी उपस्थित राहणार असून, त्यांची प्रकट मुलाखतही होणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रदर्शनाची लोकप्रियता अधिक वाढणार आहे.उदघाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न सायखेडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव शंतनू देशपांडे यांनी मानले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नरेडको नाशिकची मोठी टीम अथक परिश्रम घेत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने या भव्य गृहप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी केले आहे.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मोठी टीम प्रयत्नशील
प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर, अध्यक्ष सुनील गवादे सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल, अभय नेरकर, चेअरमन अभय तातेड, सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन यांच्यासह मोठी टीम या आयोजनासाठी काम करत आहे.या व्यतिरिक्त भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेकर, मुकुंद साबु, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनावणे, शशांक देशपांडे आदी सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.




[…] कुंभमेळ्यानंतर नाशिकच्या रिअल इस्टे… […]