
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अमावस्या/पौष शुक्ल प्रतिपदा. विश्वावसूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज वर्ज्य दिवस आहे”
नक्षत्र: मूळ.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- धनु. (गंड योग, नाग करण आणि किंस्तुघ्न करण -अशुभ (Marathi Rashi Bhavishya)
२० डिसेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुम्ही तात्विक आणि वैचारिक बैठकीचे आहात. तुम्हाला लेखनाची आवड असून कविता आणि रहस्यकथा यातून प्रसिद्ध तुम्ही पावतात. तुम्ही अत्यंत विश्वासू असतात आणि वरिष्ठ तुमच्यावर नेहमीच खुश असतात. तुम्हाला कायद्याचे पालन करणे आवडते. व्यावहारिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही गोष्टींमध्ये तुमचे मन रमते. मात्र तुमच्या भोवती ढोंगी मित्रांचे जाळे असू शकते. तुमचे आर्थिक नियोजन नेहमी चुकते. पाणथळ जागी तुमचा भाग्योदय होतो. तसेच विवाहानंतर तुम्हाला स्थैर्य प्राप्त होते. स्वच्छता व्यवस्थितपणा आणि टापटीप याचे तुम्हाला आवड असते. तुमच्या कौटुंबिक जीवनात बरेच चढ-उतार होतात.
व्यवसाय:- मंत्री, राजदूत, शिक्षक, धर्मगुरू, सल्लागार यातून लाभ मिळतात.
आरोग्य:- रक्ताभिसरण, मानसिक त्रास, अस्वस्थता, अशक्तपणा यापासून सावध रहा.
शुभ दिवस:- सोमवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ अंक:– २,६,९.
शुभ रंग:– बदामी.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज काही विचित्र घटना घडतील. मात्र त्यातून तुमचा लाभ होणार आहे. राजकीय क्षेत्रात उलथापालथ होणार आहे. कुलदेवतेची कृपा राहील.
वृषभ:– (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) तुमच्या अष्टम स्थानी अमावस्या आहे. सकाळच्या सत्रात महत्वाची कामे नकोत. वाहन जपून चालवा. संकटे टाळण्यासाठी श्री. गणेशाचा जप/उपासना करा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आज कोणत्याही कृतीची घाई करू नका. नीट अभ्यास करून निर्णय घ्या. जोडीदार नाराज होऊ शकतात. पत्नीसाठी वेळ द्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभ देणारा कालावधी आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र आरोग्याची काळजी घ्या. रवी- चंद्र युती मोठ्या व्यवहाराची मुहूर्तमेढ घालून देतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कुंडलीला बळ देणारे ग्रहमान आहे. अचानक लाभाचे योग आहेत. सरकार दरबारी कामे होतील. सन्मान मिळतील. प्रेमात उतावीळपणा नको.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) राजकीय क्षेत्रात आज तुम्हाला रुची निर्माण होईल. तुमचे अभ्यासपूर्ण विवेचन इतरांना प्रभावित करेन. काही ठिकाणी कठोर भूमिका घ्याल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसाय वाढीसाठी पोषक वातवरण आहे. त्याचा लाभ घ्या. तुमचा दबदबा वाढेल. हाताची मात्र काळजी घ्या. भावंडना नाराज करू नका.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्या मनात नक्की काय चालले आहे याचा इतरांना अंदाज येत नाही. आज तुमच्या बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. सध्या तुम्ही मजा करण्याच्या मूडमध्ये आहात. पण राजकीय क्षेत्र तुम्हाला शांत बसू येणार नाही.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज सकाळी तुमच्या राशीत अमावस्या आहे. हा कालावधी महत्वाचा आहे. संध्याकाळी चंद्र मंगळ युती तुम्हाला कठोर बनवेंन. आक्रमक धोरण स्वीकारेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्या व्यय स्थानी अमावस्या आहे. फार महत्वाचे निर्णय घेऊ नका. संयमाने काम करा. खर्चात वाढ होऊ शकते. लॉटरी मधून यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सध्या ग्रहमान अत्यंत अनुकूल आहे. सूर्य, चंद्र, मंगळ आणि शुक्र अनुकूल आहेत. वेळेचा सदुपयोग करा. धाडसी आणि आक्रमक निर्णय घ्याल. सर्व सुखे मिळतील. नावलौकिक वाढेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नोकरी/व्यवयसाय यात दबदबा वाढेल. वरिष्ठ पदावर जाल. मान्यता मिळेल. समजाईक कार्यात अग्रेसर राहाल. अडचणी कमी होतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)




