“नाशिकमध्ये स्थायिक व्हायला मला नक्कीच आवडेल”-अभिनेत्री श्रुती मराठे
होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोला श्रुती मराठेंची खास भेट

नाशिक,दि, २० डिसेंबर २०२५ – Shruti Marathe Visits Homeathon नरेडको नाशिक आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ ला आज विशेष आकर्षण ठरली ती या प्रदर्शनाची ब्रँड अॅम्बेसिडर आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रुती मराठे यांची उपस्थिती. मराठी चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रात आपल्या सशक्त अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या श्रुती मराठे या विश्वास, आधुनिकता आणि कुटुंबवत्सल मूल्यांचे प्रतीक मानल्या जातात. त्यांच्या आगमनामुळे प्रदर्शनातील वातावरण अधिक उत्साही झाले.
या प्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमात RJ भूषण मटकरी यांनी श्रुती मराठे यांची मनमोकळी मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी घर, स्वप्न, संघर्ष आणि स्थायिक होण्याचा अनुभव अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी शब्दांत मांडला.श्रुती मराठे म्हणाल्या, “मला नाशिक हे शहर मनापासून आवडते. अनेक वेळा कार्यक्रमानिमित्त नाशिकला येते आणि इथे स्थायिक व्हायला मला नक्कीच आवडेल.” त्या पुढे नाशिककरांना संदेश देताना म्हणाल्या की, “स्वतःचे हक्काचे घर घेणे खूप महत्त्वाचे असते. नरेडकोच्या या एक्स्पोमधून तुमचे स्वप्नातील घर पूर्ण करा.”

आपल्या वैयक्तिक घरखरेदीच्या प्रवासाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “२०१२ साली मी मुंबईत आले. त्याआधी पुण्यात राहत होते. मुंबईत स्थायिक व्हायचे असेल तर स्वतःचे घर असणे किती गरजेचे आहे, हे मला काम करताना जाणवले. मुंबईत घर घेणे हे माझे स्वप्न होते; पण ते पूर्ण व्हायला तब्बल १० वर्षे लागली.”आज मी माझ्या हक्काच्या घरात राहत असून, हे स्वप्न पूर्ण होण्यामागे माझ्या वडिलांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मला धाडस दिले आणि त्यांच्याच प्रोत्साहनामुळे मी हे पाऊल उचलू शकले,” असेही त्या भावूकपणे म्हणाल्या.
मुंबई व पुण्यानंतर कोणते शहर आवडते, या प्रश्नावर उत्तर देताना श्रुती मराठे म्हणाल्या, “जर मी मुंबई किंवा पुण्यात स्थायिक झाले नसते, तर माझे पुढचे पर्याय नाशिक किंवा कोल्हापूर असते.” कामासाठी मुंबईत राहणे आवश्यक असल्याने त्यांनी मुंबईत २ बीएचके फ्लॅट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.लक्झरी की कम्फर्ट घर, या प्रश्नावर त्या स्पष्टपणे म्हणाल्या, “कंफर्ट घर हेच खरे महत्त्वाचे असते. लक्झरी काही काळासाठी चांगली वाटते; पण कम्फर्ट असेल तर त्या घरात कायमस्वरूपी राहण्याचा आनंद मिळतो.”
आपल्या घरातील हॉल, बेडरूम, किचन आणि बाल्कनीबाबतही त्यांनी रंजक माहिती दिली. “माझा हॉल एंटरटेनिंग आहे. मोठा टीव्ही, रिलॅक्स करण्यासाठी मोकळी जागा आणि रिकलायनर चेअर आहे. आजोबांची जुनी खुर्ची मी आठवण म्हणून जपून ठेवली आहे,” असे त्यांनी सांगितले.बाल्कनीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “बाल्कनी हा प्रत्येकाचा हळवा कोपरा असतो. मुंबईत बाल्कनी मिळणे कठीण आहे; पण नाशिकमध्ये मोठ्या बाल्कनी असलेले फ्लॅट्स पाहून खूप छान वाटते.”
मुलाखतीनंतर अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते प्रॉपर्टी बुक केलेल्या ग्राहकांपैकी भाग्यवान विजेत्यांना चांदीचे नाणे भेट देण्यात आले. त्याआधी नरेडको पदाधिकाऱ्यांच्या सहचरणींच्या हस्ते त्यांचा पैठणी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला नाशिक पोलीस दलातील डीसीपी किशोर काळे आणि मोनिका राऊत यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आभार अभय नेरकर यांनी मानले.श्रुती मराठेंच्या प्रेरणादायी विचारांमुळे आणि अनुभवांमुळे होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोमधील हा दिवस नाशिककरांसाठी खास आणि लक्षवेधी ठरला.
प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, नागरिकांचा घरखरेदीकडे वाढता कल(Shruti Marathe Visits Homeathon)
नरेडको नाशिक आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोला नागरिकांचा दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज दुसऱ्या दिवशीही प्रदर्शन परिसर गजबजलेला दिसून आला. आज तब्बल ९,००० हून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत घरखरेदी व गुंतवणुकीबाबत माहिती घेतली.प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी फ्लॅट, प्लॉट तसेच कमर्शियल दुकानांसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उत्साह दाखवला. सुमारे ८० जणांनी प्रत्यक्ष बुकिंग करत आपले स्वप्नातील घर किंवा गुंतवणूक निश्चित केली. या बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला नरेडकोच्या वतीने १० ग्रॅम चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आले. प्रदर्शनाचे अजून दोन दिवस शिल्लक असून, अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी केले आहे.
स्पॉन्सर्सची भक्कम साथ
या भव्य प्रदर्शनासाठी विविध नामांकित संस्थांची मोलाची साथ लाभली आहे.Title Sponsor म्हणून दीपक बिल्डर अँड डेव्हलपर्स सहभागी आहेत.Co-powered by एबीएच डेव्हलपर्स आणि ललित रूंगटा ग्रुप यांनी प्रदर्शनाला बळ दिले आहे.याशिवाय Bathing Partner म्हणून जॅक्वार अँड सिरॅमिक ट्रेडर्स,Virtual Reality Partner म्हणून द व्हीआर कंपनी,तर Communication Partner म्हणून बीएसएनएल कार्यरत आहेत.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी टीमचा अथक प्रयत्न
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नरेडको नाशिकची मोठी आणि समर्पित टीम सातत्याने काम करत आहे. समन्वयक जयेश ठक्कर, अध्यक्ष सुनील गवादे, सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल, अभय नेरकर, चेअरमन अभय तातेड, सचिव शंतनू देशपांडे आणि खजिनदार भूषण महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन आकार घेत आहे.त्याचबरोबर भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेकर, प्रशांत पाटील, मुकुंद साबु, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनावणे, शशांक देशपांडे आदी सदस्यही दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो नागरिकांसाठी विश्वासार्ह आणि उपयुक्त व्यासपीठ ठरत आहे




[…] […]