
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
पौष शुक्ल प्रतिपदा/द्वितीया. हेमंत ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२. उत्तरायण.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – पू. षा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु. वृद्धी योग.
२१ डिसेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)
तुम्ही प्रामाणिक आणि कायदा प्रेमी आहात मात्र तुमच्यात अधिकार गाजवण्याची वृत्ती आहे. स्वार्थी लोकांचा तुम्हाला राग येतो. अशाकडून पीडित व्यक्तीसाठी तुम्ही परोपकार करतात. आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्हालाप्रसिद्धी आणि मान मरातब मिळतो. तुम्ही कीर्ती दिगंत पसरते. कला, शास्त्र, साहित्य, मनोरंजन अन काव्य यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही धार्मिक पर्यटन आनंदाने करतात. तुमच्यावर चन्द्र आणि रविचा प्रभाव आहे. हळवेपणा आणि कठोरपणे हे दोन्ही तुमच्यात आहे.
व्यवसाय:- राजकारण, मंत्री, परदेश सेवा, दूत, न्यायखाते, प्रवचन, प्राध्यापक डॉक्टर.
आरोग्य:- छातीचे विकार, फुफुसचे विकार, मेंदूतील रक्तस्त्राव यापासून काळजी घ्या.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ अंक:- ३,६,९
शुभ रंग:- पिवळा, जांभळा.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्र नवम स्थानी अनुकूल आहे. तेथे ग्रहांची मांदियाळी आहे. शुक्राने धनु राशीत प्रवेश केला आहे. पर्यटन घडेल. आवडीच्या ठिकाणांना भेटी द्याल. पित्याचे मार्गदशन आणि मिळेल. भाग्य उजळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सांभाळून पावले टाकण्याचा कालावधी आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. यंत्र सामुग्री जपून हाताळा. स्त्री धन वाढेल. इतरांकडून मदत मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) ग्रहमान प्रसन्न आहे. कामाचा उत्साह वाढेल. शत्रू पराभूत होतील. कोर्ट कामात यश मिळेल. सरकारी अकमे करताना काळजीपूर्वक करा. दुर्लक्ष नको.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) व्यवसायात तेजी निर्माण होईल. नवनवीन व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळेल. प्रगतीची वाटचाल होणार आहे. प्रवासात काळजी घ्या. ज्येष्ठ व्यक्तीची सेवा करा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मनाला उभारी देणारे ग्रहमान आहे. पंचम स्थानी महत्वाचे ग्रह आहेत. तुमच्या मूळच्या शांत आणि महत्वाकांक्षी स्वभावानुसार वाटचाल करावी लागेल. सूर्याची अनुकूलता नसल्याने दररोज उगवत्या सूर्याची उपासना करा. प्रेमात यश मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चतुर्थ चंद्राचा दशम गुरूशी प्रतियुती योग आहे. नवीन खरेदी होईल. धार्मिक कामासाठी वेळ द्याल. घरासाठी महत्वाची खरेदी होईल. वाहन सुख लाभेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यावसायिक वाढीसाठी पोषक ग्रहमान आहे. कामाचा वेग वाढेल. नात्यातून मदत मिळेल. लेखकांना उत्तम यश मिळेल. प्रकाशन क्षेत्रात नावलौकिक मिळेल. धार्मिक तीर्थयात्रा घडेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कलाकारांना चांगला दिवस आहे. बुध शुक्र अनुकूल आहे. त्यांची मदत मिळेल. प्रतिकूल रवी, मंगळ याना गांभीर्याने घ्या. त्यातच अष्टम गुरुशी चंद्राची प्रतियुती आहे. महिलांना नवीन दागिने मिळतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जरी तुमच्याच राशीत चंद्र असला तरी ग्रहमान अनुकूल नाही. मन शांत ठेवून काम करा. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. अहंकार टाळणे हिताचे आहे. सप्तम स्थानी गुरू आहे. श्री. दत्तगुरूंची उपासना करा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सावधपणे वाटचाल करा. सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करा. क्रोध आवरा. व्यय स्थानातील शुक्र काही उत्साह वाढवणाऱ्या घडताना घडवून आणेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सूर्य, मंगळ, बुधा, शुक्र, चंद्र अनुकूल आहेत. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. वेळ न दवडता कामे पूर्ण करा. इच्छापूर्ती करणारे ग्रहमान आहे. सन्मान वाढेल. अधिकार पदे मिळतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अधिकारात वाढ होणार आहे. मनासारखी बदली किंवा बढती मिळेल. सुटीच्या दिवशी काम करावे लागेल. राजाश्रय मिळेल. मात्र सामाजिक कार्यातून इतरांची नाराजी संभवते.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)




