
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
पौष शुक्ल द्वितीया/तृतीया. शके १९४७, संवत२०८२,
विश्वावसुनाम संवत्सर. हेमंत ऋतू, उत्तरायण.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु/मकर. (ध्रुव योग)
“आज शुभ दिवस आहे.” (Marathi Rashi Bhavishya)
मेष:- आज धनालाभचा दिवस आहे. मंगलमय क्षण आहे. आर्थिक बाजू भक्कम होईल. तुमच्या अधिकाराचा आणि सामाजिक स्थानाचा तुम्हाला उपयोग होईल.
वृषभ:- सकाळ संमिश्र आली तरी सौख्य प्रदान करणारा दिवस आहे. तुम्ही जे ठरवतात ते होईल. आज तुमच्या नियोजनात थोडासा बदल करावा लागेल. मात्र तरीही तुम्हा उत्साह कमी होणार नाही. प्रवास घडतील.
मिथुन:- आज तुमची निसर्गात फिरण्याची आवड अधिक तीव्र होईल. घराभोवती उत्तम बागकाम कराल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्याल. मन धार्मिक विचारांनी भरून जाईल. उत्तरार्ध चिंता वाढवणारा आहे.
कर्क:- उद्योग/व्यवसाय यात आज तुम्ही व्यस्त असणार आहात. आर्थिक आवक भरपूर होणार आहे. मानसिक सौख्य लाभेल. मन आनंदाने भरून जाईल. कुलदेवतेची सेवा आणि उपासना करा.
सिंह:- तुम्हाला स्तुती आणि प्रशंसा मनापासून प्रिय आहे. आज त्याचा अनुभव येईल. तुमचे कौतुक होईल. वक्तृत्व चमकेल. तुमची बुद्धिमत्ता आज विशेष उठून दिसेल. शब्दाला मान मिळेल. व्यवसाय वाढेल.
कन्या:- चतुर्थ आणि पंचम स्थानी चंद्र आहे. आज अत्यंत प्रसन्न ग्रहमान आहे. संशोधन, चिकटीस आणि दर्जा नियंत्रण ही तुमची वैशिष्टये आहेत. त्यात आज भरपूर प्रगती होईल. अचानक लाभ होणार आहे. लॉटरी मधून नशीब अजमाऊन बघण्यास हरकत नाही.
तुळ:- काही खर्च हे आनंद देणारे असतात. आज नवीन वस्तूची खरेदी होईल. घरात बदल कराल. अष्टम स्थानी हर्षल आहे. पत्नीकडून लाभ होतील.
वृश्चिक:- द्वितीय आणि तृतीय स्थानी चंद्र आहे. उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. जण संपर्क वाढेल. शब्दाला मान मिळेल. लेखनातून आर्थिक लाभ होतील.
धनु:- उद्योग – व्यवसाय तुम्हाला मानापासुन आवडतो. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. आज एका नव्या उत्साहाने तुम्ही कामास सुरुवात कराल. त्यात तुम्हाला भक्कम यश मिळणार आहे. आरोग्यात सुधारणा अपेक्षित आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
मकर:- दिवसाचा पूर्वार्ध संथ हआहे. आज तुमच्यावर नवीन जबादारी पडणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. एखादे नको असलेले किंवा न आवडणारे काम करावे लागू शकते. उत्तरार्ध मात्र उत्साह वाढवणारा आहे.
कुंभ:- आज दुपार नंतर चंद्राची फारशी अनुकूलता नाही. मात्र इतर ग्रहमान अनुकूल आहे त्यामुळे चिंता नाही. चंद्राचा शनिशी लाभ योग आहे. शब्दाला मान मिळेल. राजकीय क्षेत्रात सन्मान होईल.
मीन:- ग्रहमान अनुकूल आहे. अनेक नवीन संधी चालून येणार आहेत. तुमच्या राशीत शनी आहे. चंद्राशी शुभ योग् आहे. प्रगतीदायक घटना घडतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)




