आजचे राशिभविष्य बुधवार, २४ डिसेंबर २०२५

२४ डिसेंबर  रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

2

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

पौष शुक्ल चतुर्थी/पंचमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२.

हेमंत ऋतू. उत्तरायण.  

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 

“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे”   

नक्षत्र -धनिष्ठा.

आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर/कुंभ. (हर्षण योग, विष्टी करण शांती)

२४ डिसेंबर  रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)

दांडगा आत्मविश्वास, परोपकारी वृत्ती, भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही लहरी आणि हट्टी आहात. सामाजिक रीतिरिवाज बद्दल तुम्ही आग्रही असतात. तुम्ही न्यायी असले तरी कधीकधी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.इतरांना तुम्ही काहीसे उद्धट आणि शिष्ट वाटतात. उत्तम स्मरणशक्तीचा तुम्हाला वरदान आहे. त्यामुळे जुन्या चांगल्या आणि वाईटही गोष्टी तुम्ही विसरत नाहीत. मान सन्मान मिळालेले तुम्हाला मनापासून आवडतात. वारसा हक्काने तुम्हाला संपत्ती आणि परंपरा मिळतात अनेकदा तुम्ही चाकोरी सोडून वागतात आणि त्यामुळे गोत्यात येतात. 

उष्णतेचे विकार, पित्त, मूत्राशय याच्या विकारांपासून सावध रहा.

शुभ रंग:- पिवळा.

शुभ दिवस;- सोमवार, मंगळवार, गुरुवार.

शुभ अंक:- ३,६,९

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दशम स्थानी चंद्र आहे. कर्म करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या पूर्वजांची पुण्याई कामी येईल. नात्यातून मदत मिळेल. व्यवसाय वाढीसाठी पोषक वातावरण आहे. संध्याकाळ नंतर एखादी  अनपेक्षित घटना घडू शकते.     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामानिमित्त प्रवास घडतील. सध्या तुमच्या आयुष्यात काही अनोख्या घटना घडतील. अराजकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखवाल.   

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अजूनही फारशी अनुकूलता नाही. मात्र संध्याकाळ नंतर फरक पडेल. सवंशपणे पावले टाका. महत्वाचे निर्णय घेताना व्यावसायिक सल्ला घ्या. 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सध्या अनुकूलता आहे तोपर्यंत कामे पूर्ण करा. मान सन्मान मिळतील. महिलांशी संबंधित वस्तू, तयार कपडे, दागिने या व्यवसायातून लाभ होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.  

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) षष्ठ आणि सप्तम स्थानी चंद्र आहे. संध्याकाळ नंतर चंद्राचा हर्षलशी केंद्र योग आहे. पंचम शुक्र तुमच्या आयुष्यात रंगत निर्माण करेन. नवीन काहीतरी करावेसे वाटेल. उत्साह वाढेल.    

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चिकित्सा आणि संशोधन क्षेत्रात रुची निर्माण होईल. त्यात उत्तम यश देखील मिळेल. व्यय स्थानातील केतूमुळे आरोग्यावर खर्च होऊ शकतो. सप्तम शनीची मर्जी सांभाळा. जोडीदाराची काळजी घ्या. 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरी व्यतिरिक्त अतिरिक्त व्यवसाय करण्याचा तुमचा स्वभ्याव आहे. आज त्यासाठी विशेष मेहनत घ्याल. तुमच्यातील व्यावसायिकता शिखरावर पोहोचेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.    

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उद्योग/व्यवसायात मोठी मजल गाठू शकाल. मौल्यवान खरेदी होईल. स्वतःच्या वास्तू संबंधित कामांसाठी काहीशी वाट बघावी लागेल.  

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. अधिकार वाढतील. लवकरच एकही चांगल्या बातम्या किंवा संदेश मिळतील. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा.   

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्या राशीत चंद्र आहे. संध्याकाळ नंतर चंद्र कुंभ राशीत प्रवेश करेल. तुम्हाला राजकारणात रस असतो मात्र सध्या संयम ठेवावा लागेल. काहीशी वाट बघावी लागेल. एखादी सहल घडेल.  

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अजूनही फारशी अनुकूलता नाही. मोठी झेप घेणे आज टाळा. नेहमीची कामे चालू ठेवा. तुमच्या राशीतील राहू तुमचा बुद्धिभ्रम करू शकतो. डोळसपणे निर्णय घ्या.   

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्रअनुकूल आहे. मनासारख्या घटना घडतील. मन काहीसे विरक्त होईल. अध्यात्मात रस निर्माण होऊ शकतो. निवासाचे ठिकाण बदलण्याचा विचार कराल.    

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] […]

Don`t copy text!