
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल पंचमी/षष्ठी.विश्वावसुनाम संवत्सर.शके १९४७, संवत २०८२.
हेमंत ऋतू. उत्तरायण.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे”
नक्षत्र – धनिष्ठा/शततारका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.(वज्र्य योग)
२५ डिसेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-
तुम्ही बुद्धिमान, प्रयोगशील आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व आहात. समाजात वेगळा ठसा उमटवण्याची क्षमता तुमच्यात आहे. स्वतंत्र विचारसरणीमुळे तुम्ही अनेकदा रूढी-परंपरांना छेद देता. मित्रपरिवार मोठा असतो, मात्र मोजक्यांवरच पूर्ण विश्वास ठेवता.संशोधन, तंत्रज्ञान, लेखन, अध्यात्म आणि सामाजिक कार्यात तुम्हाला विशेष गती मिळते कधी कधी अती-विचारामुळे मानसिक ताण येऊ शकतो.रक्तदाब, स्नायू आणि मज्जासंस्थेशी संबंधित तक्रारींकडे लक्ष द्या.
शुभ रंग :- निळा, पांढरा
शुभ दिवस :- गुरुवार, शनिवार
शुभ अंक :- ४, ८
मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)-रवी लाभ चंद्र योगामुळे प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. सरकारी कामे मार्गी लागतील. संध्याकाळी आनंददायी बातमी मिळू शकते.
वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)–चंद्र लाभ मंगळ योगामुळे कामाचा वेग वाढेल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. जमीन-जुमल्याशी संबंधित चर्चा पुढे सरकतील. संयम ठेवल्यास मोठा लाभ होईल.
मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)आजचा दिवस प्रगतीचा आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रवासातून लाभ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. मात्र बोलताना शब्द जपून वापरा.
कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)–चंद्र लाभ शुक्र योगामुळे कौटुंबिक सुख वाढेल. गृहसौख्य, वाहन किंवा दागिन्यांची खरेदी संभवते. महिलांसाठी दिवस विशेष अनुकूल आहे. आरोग्य मात्र जपा.
सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)–महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस. नेतृत्वगुण प्रकट होतील. सामाजिक सन्मान मिळेल. संध्याकाळनंतर थोडा मानसिक थकवा जाणवू शकतो.
कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)–नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. आर्थिक नियोजनासाठी योग्य वेळ आहे. पोटाशी संबंधित तक्रारींकडे लक्ष द्या.
तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)–व्यावसायिक विस्तारासाठी उत्तम दिवस. भागीदारीत लाभ होईल. कायदेशीर बाबी अनुकूल ठरतील. समाजात मान-सन्मान वाढेल.
वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)–उद्योगधंद्यात मोठी झेप घेण्याची संधी आहे. आर्थिक स्थैर्य मिळेल. गुप्त शत्रूंवर मात कराल. भावनिक निर्णय टाळा.
धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)–आत्मविश्वास वाढेल. अध्यात्मिक विचारांकडे कल वाढेल. नवीन शिक्षण किंवा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे.
मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)–कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचा विश्वास मिळेल. मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्या. विश्रांती आवश्यक आहे.
कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)–तुमच्या राशीत चंद्र असल्याने दिवस महत्त्वाचा आहे. नवीन योजना आखाल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या.
मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)–चंद्र अनुकूल नसल्याने मन उदास राहील. कला, लेखन आणि अध्यात्मात प्रगती होईल. स्थलांतर किंवा निवासबदलाचा विचार पुढे सरकेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


