
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
पौष शुक्ल षष्ठी/सप्तमी. शके १९४७, संवत २०८२. विश्वावसुनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
चंद्रनक्षत्र – शततारका/पू. भा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.(Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा बुधाशी केंद्र योग आहे. तरीही अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. व्यापारात भरपूर नफा होईल. इच्छापूर्ती होईल. मनासारखी कामे होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. नोकरी/व्यवसायात प्रगती होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील. धर्माचे काम कराल. उच्च शिक्षणात यश मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. नवम स्थानी चंद्र आहे. आज काही रोचक अनुभव येतील. नात्यातून लाभ होतील. राजकारणात तुमचे वजन वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अष्टम स्थानी चंद्र आहे. वैज्ञानिक शिक्षणात वरिष्ठ स्थानी जाल. मित्र मंडळी यांचा सहवास लाभेल. कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक लाभ होतील. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यवसायात वाढ होईल. नोकरीत चांगले अनुभव येतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. मात्र त्याचा परतावा मिळण्यास वेळ लागेल. संयम ठेवावा लागेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायात तुम्हाला चांगले यश मिळेल. आज मनासारखी कामे होतील. बुद्धी कौशल्यचा वापर कराल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सामाजिक कार्यात आज तुम्ही पुढे असणार आहात. आर्थिक उलाढाल वाढेल. प्रगतीचा वेग चांगला राहील. स्पर्धेत तुम्हाला विजय प्राप्त होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) चतुर्थ स्थानी चंद्रआहे. अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसाय वाढेल. आर्थिक आवक चांगली असणार आहे. बुद्धीचातुर्य दाखवाल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तृतीय चंद्र आहे. सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जमिनीतून उत्तम लाभ होतील. स्थावर संपत्ती वाढेल. मात्र एखादा निर्णय चुकू शकतो.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज तुमच्या द्वितीय स्थानी चंद्र आहे. कामानिमित्त केलेल्या प्रवासात त्रास होऊ शकतो. काही चुकीचे निर्णय होऊ शकतात. आज नवीन ओळखीतून फायदा होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. दशम स्थानी बुध आहे. कामाच्या ठिकाणी काहीसा मानसिक गोंधळ उडू शकतो. आत्मविश्वास वाढला तरी संयम आवश्यक आहे.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यय स्थानी चंद्र आहे. प्रवासाचे नियोजन चुकू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तीशी मतभेद संभवतात. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्याल.
२६ डिसेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शनी व गुरूचा प्रभाव आहे. तुम्ही कलासक्त, कलाप्रेमी आहात. सौंदर्याचे भोक्ते आहात. नीटनेटकेपणा, सजावट, सुगंधी द्रव्ये यांची तुम्हाला आवड आहे. मित्रमंडळी मध्ये तुम्ही रमतात. तुम्ही काहीसे आळशी असले तरी आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. मोठमोठ्या योजना तुम्ही सहज पूर्ण करतात. कार्यक्षमता, परोपकार हे तुमचे वैशिष्ट्य आहे.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



[…] आजचे राशिभविष्य शुक्रवार, २६ डिसेंबर … […]