
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
पौष शुक्ल अष्टमी/नवमी
हेमंत ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे” दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सव आरंभ
चंद्र नक्षत्र – उ.भा./रेवती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन (Marathi Rashi Bhavishya)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र ग्रहमान आहे. आज तुम्हाला मानसन्मान मिळतील. थंड हवेत फिरण्याचा आनंद घ्याल. दक्षिण दिशेकडून लाभ होतील. परदेश गमन घडू शकते.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र ग्रहमान आहे. चंद्र अनुकूल आहे. त्यामुळे मन उंच भरारी घेईन. कामानिमित्त प्रवास करावा लागेल मात्र आज तुमचा प्रवासाचा बेत नव्हता त्यामुळे तुम्ही काहीशी चिडचिड कराल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आज तुम्हाला निसर्गात भटकण्याची आवड निर्माण होईल. शहरी क्षेत्रापासून दूर जावेसे वाटेल. व्यवसाय मात्र वाढेल. आणि त्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. तरीही तुम्ही वेळेचे योग्य नियोजन कराल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज फारशी अनुकूलता नाही. तुम्ही जे ठरवणार आहात त्यापेक्षा वेगळे काहीतरी घडेल. आवडत्या छंदासाठी वेळ द्याल. लेखकांना उत्तम दिवस आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अष्टम स्थानी चंद्र आहे. तुमच्या अधिकाराचा योग वापर कराल. भ्रमंती घडेल. वेळेचा सदुपयोग करा. आरोग्य सांभाळा. वाहन जपून चालवा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज अनुकूल ग्रहमान आहे. तुमचा सल्ला नेहमीच प्रामाणिक आणि मोलाचा असतो. आज तुम्ही मित्रांना योग्य मार्गदशन कराल. व्यवसाय वाढीसाठी चांगले वातावरण आहे.जोडीदाराचा सन्मान कराल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) व्यापार वाढेल. कधीकधी आवडत्या गोष्टींसाठी खर्च झाला तर वाईट वाटत नाही. आज तुम्ही खर्च होऊनही आनंदी असणार आहात. तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी एखादी भेटवस्तू घ्याल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पंचम स्थानी चंद्र आहे. काही सुखद घटना घडतील. मात्र संततीची काळजी वाटेल. तुमची प्रतिष्ठा आज पणाला लागणार आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) चतुर्थ चंद्र मनःशांती देईन मात्र तेथे शनी महाराज आहेत. घरात शांतता राखणे तुमच्या हातात आहे. मोठे व्यवहार आज नकोत.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यवसायासाठी उत्तम ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. लोखंड व्यावसायिकांना चांगले ग्रहमान आहे. सूर्य उपासना लाभदायक ठरेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) द्वितीय चंद्र आहे. साडेसाती चालू आहे याची जाणीव ठेवावी लागेल. तुमच्या राशीतील राहू आणि द्वितीय शनी यांमुळे जपून पावले टाका. मोजके बोला. अहंकार नको. राहुची उपासना करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र अनुकूल आहे. दीर्घकालीन प्रगतीचा आराखडा तयार करा. नवीन संधी चालून येणार आहेत. घरगुती पातळीवर संशयकल्लोळ किंवा वाद टाळा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)


