

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक(Marathi Rashi Bhavishya)
पौष कृष्ण सप्तमी.,वृद्धी तिथी.,विश्वावसुनाम संवत्सर.,शके १९४७, संवत २०८२.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज दुपारनंतर दिवस अधिक अनुकूल होईल”
नक्षत्र – (नक्षत्र स्थितीनुसार)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.
आज वृद्धी तिथी
ग्रहयोग :-
रवी युती मंगळ – आत्मविश्वास, धाडस, पण रागावर नियंत्रण आवश्यक
चंद्र केंद्र बुध – विचारशक्ती, संवाद, लेखन, व्यवहारात प्रगती
शुक्र प्रतियुती गुरू – प्रेम, अर्थकारण व नातेसंबंधात संयम आवश्यक
९ जानेवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये :-(Marathi Rashi Bhavishya)
तुम्ही धाडसी, स्पष्टवक्ते आणि आत्मविश्वासू स्वभावाचे असता. निर्णयक्षमतेत वेग असून नेतृत्वगुण तुमच्यात उपजत असतात. अन्याय सहन न करणारे, स्पष्ट भूमिका घेणारे व्यक्तिमत्त्व तुमचे असते. कधी कधी उतावीळपणा आणि रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरते. सूर्य-मंगळ प्रभावामुळे तुमच्यात प्रचंड ऊर्जा असते, पण संयम ठेवल्यास जीवनात मोठी उंची गाठू शकता.
व्यवसाय :- प्रशासन, संरक्षण क्षेत्र, अभियांत्रिकी, क्रीडा, उद्योग, राजकारण, व्यवस्थापन.
आरोग्य :- रक्तदाब, डोकेदुखी, अपघात, स्नायू ताण याकडे लक्ष द्या.
शुभ दिवस :- मंगळवार, रविवार, शुक्रवार.
शुभ रंग :- लाल, केशरी.
♈ मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ) -रवी-मंगळ योगामुळे आत्मविश्वास वाढेल. कामात पुढाकार घ्याल. मात्र रागावर संयम ठेवा. दुपारनंतर आर्थिक लाभ संभवतो.
♉ वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) -शुक्र-गुरू प्रतियुतीमुळे खर्च वाढू शकतो. नातेसंबंधात अपेक्षा वाढतील. व्यवहारात सावधगिरी ठेवा.
♊ मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)-चंद्र-बुध केंद्र योगामुळे विचार स्पष्ट होतील. लेखन, बोलणे, करार यासाठी उत्तम दिवस. विद्यार्थ्यांना यश.
♋ कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)-घरगुती बाबींमध्ये लक्ष द्यावे लागेल. भावनिकता वाढेल. दुपारनंतर मनःशांती लाभेल.
♌ सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)-नेतृत्वगुणांना वाव मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. रवी-मंगळ योग लाभदायक, पण अहंकार टाळा.
♍ कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)-कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. चंद्र-बुध योगामुळे बौद्धिक कामात यश मिळेल.
♎ तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)-शुक्र-गुरू प्रतियुतीमुळे नातेसंबंधात गैरसमज संभवतात. संवाद स्पष्ट ठेवा. संध्याकाळी वातावरण सुधारेल.
♏ वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)-गुप्त शत्रूंविषयी सावध रहा. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम ठेवल्यास फायदा होईल.
♐ धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)-भागीदारीत मतभेद संभवतात. गुरु-शुक्र प्रतियुतीमुळे अपेक्षा वाढतील. संयम आवश्यक.
♑ मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)-कामात स्थिरता राहील. जबाबदाऱ्या वाढतील. दुपारनंतर आराम व समाधान मिळेल.
♒ कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)-नवीन कल्पना सुचतील. सर्जनशील कामात यश मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
♓ मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)-भावनिक निर्णय टाळा. घरगुती विषयांवर चर्चा होईल. ध्यान-साधना लाभदायक ठरेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)



[…] आजचे राशिभविष्य शुक्रवार, ९ जानेवारी … […]