महाराष्ट्रातील २९ शहरांमध्ये उद्या मतदान; मुंबईसह राज्याचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
नाशिकचा ‘महा’संग्राम: उद्या १२२ जागांसाठी मतदान


मुंबई ,दि, १४ जानेवारी २०२६ – Maharashtra Municipal Elections 2026 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा दीर्घकाळ चाललेला राजकीय वनवास अखेर संपुष्टात येत आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर महाराष्ट्रातील २९ महत्त्वाच्या महानगरपालिकांसाठी उद्या, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूरसारख्या शहरांतील ही लढत केवळ महापालिकांपुरती मर्यादित नसून, ती २०२९ च्या विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिली जात आहे.
उद्या सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. राज्य निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा पूर्ण तयारीनिशी सज्ज असून, शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने मतदान पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रचार थांबला, पण राजकीय धडधड कायम (Maharashtra Municipal Elections 2026)
काल मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी राज्यभर सभांचा सपाटा लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महायुतीसाठीजोरदार प्रचार केला तर विरोधी गोटातून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राज ठाकरे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करून प्रचारात आघाडी घेतली.आजचा दिवस राजकीय वर्तुळात ‘कौलोत्सुकतेचा दिवस’ मानला जात आहे. जाहीर प्रचार थांबला असला, तरी पडद्यामागील हालचाली, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचे प्रयत्न आणि शेवटच्या क्षणांचे गणित लावले जात असल्याचे चित्र आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये वातावरण कमालीचे चुरशीचे बनले आहे.
निवडणुकीचे मुख्य केंद्र: मुंबई महानगरपालिका (Maharashtra Municipal Elections 2026)
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे मुंबई महानगरपालिका (BMC). देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट आणि प्रतिष्ठेची लढाई होत आहे.
मुंबईतील निवडणुकीची ठळक आकडेवारी:
एकूण प्रभाग: २२७
उमेदवार: सुमारे १,७००
मतदार: १ कोटी ३ लाखांहून अधिक
मुंबईत यावेळीही ‘एक प्रभाग – एक नगरसेवक’ ही पारंपरिक पद्धत कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, प्रभागांच्या सीमांकनात झालेल्या बदलांमुळे अनेक दिग्गज नेत्यांसमोर नव्या आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. काही पारंपरिक बालेकिल्ले धोक्यात आले असून, नव्या मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई वगळता बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा प्रयोग
मुंबई वगळता उर्वरित २८ महानगरपालिकांमध्ये यावेळी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत (Panel System) लागू करण्यात आली आहे. या पद्धतीनुसार एका प्रभागातून तीन किंवा चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यामुळे मतदारांना एकाच वेळी तीन किंवा चार उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे.ही पद्धत अनेक मतदारांसाठी नवीन असल्याने, गोंधळ टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली आहे. मतदान केंद्रांवर मार्गदर्शक फलक, स्वयंसेवक आणि मदत कक्ष उपलब्ध असतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
यावेळी महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्नांपेक्षा राजकीय अस्तित्वाची आणि वर्चस्वाची लढाई अधिक ठळकपणे दिसून येत आहे.
१) मराठी अस्मितेचा मुद्दा
मुंबई आणि आसपासच्या भागात मराठी अस्मितेचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
२) विकास आणि पायाभूत सुविधा
महायुतीकडून कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, रस्ते, पाणीपुरवठा आणि धारावी पुनर्विकास यासारख्या विकासकामांचा मुद्दा आघाडीवर ठेवण्यात आला आहे.
३) फोडाफोडीनंतरची पहिली कसोटी
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतरची ही पहिलीच मोठी स्थानिक निवडणूक असल्याने, ‘खरी शिवसेना’ आणि ‘खरी राष्ट्रवादी’ कोणाची? याचा फैसला मतदारच करणार आहेत.
नाशिकचा ‘महा’संग्राम: उद्या १२२ जागांसाठी मतदान
राज्यातील इतर शहरांप्रमाणेच नाशिक महानगरपालिकेची निवडणूक देखील अत्यंत चुरशीची ठरली आहे. उद्या, १५ जानेवारी २०२६ रोजी, नाशिक मनपाच्या १२२ जागांसाठी मतदान होणार असून, शहरातील सुमारे १३ लाख ६० हजार ७२२ मतदार यामध्ये ६,५६,६७५ महिला मतदार,७,०३,९६८ पुरुष मतदार तसेच ७९ तृतीय पंथ आपला मतदानाचा हक्क बजावून आपला निर्णय देणार आहेत.
निवडणूक यंत्रणा सज्ज
मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या 4860 बॅलेट युनिट्स व 1800 कंट्रोल युनिट्स (राखीव युनिट्ससह) उपलब्ध करून देण्यात आले असून, निवडणूक कामकाजासाठी एकूण 8800 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सदर निवडणुकीसाठी एकूण 735 उमेदवार रिंगणात असून, यामध्ये 527 राजकीय पक्षांचे उमेदवार व 208 अपक्ष उमेदवार यांचा समावेश आहे.दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच संबंधित परिपत्रकाच्या अनुषंगाने निवडणूक प्रचाराच्या वेळेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. सदर परिपत्रकानुसार सायंकाळी 05:00 वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बंदीमध्ये प्रत्यक्ष प्रचार, जाहीर सभा, मिरवणुका, रॅली, ध्वनिवर्धकांचा वापर, बॅनर-पोस्टर, फ्लेक्स, पत्रके तसेच सोशल मीडिया व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल माध्यमांद्वारे होणारा प्रचार करू नये असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत.
नाशिक निवडणुकीची प्रमुख आकडेवारी:
एकूण प्रभाग: ३१ (बहुसदस्यीय)
एकूण जागा: १२२
उमेदवार: ७३५
मतदान वेळ: सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०
पॅनेल सिस्टीमची खरी कसोटी
नाशिकमध्ये यावेळी पॅनेल सिस्टीम लागू असल्याने, मतदारांना एकाच वेळी चार (काही ठिकाणी तीन) उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, आवश्यक तेवढी मते न दिल्यास मत बाद होऊ शकते. त्यामुळे मतदारांनी मतदान करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकमधील राजकीय लढती
नाशिकमध्ये यंदा चौरंगी आणि पंचरंगी लढती पाहायला मिळणार आहेत.महायुती: भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट)महाविकास आघाडी: शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेसमनसे: राज ठाकरे यांचे नाशिकवर विशेष लक्षअपक्ष आणि बंडखोर: १०० हून अधिक उमेदवार निकालाचे गणित बदलू शकतातनाशिकमधील हॉटस्पॉट प्रभागपंचवटी: प्रतिष्ठेची लढाईनाशिक पूर्व आणि मध्य: अटीतटीची लढतसातपूर व सिडको: कामगार आणि औद्योगिक मतदार निर्णायकसुरक्षा,
सुटी आणि प्रशासन सज्ज
उद्याच्या मतदानासाठी नाशिकसह सर्व शहरांमध्ये:कडेकोट पोलीस बंदोबस्त
संवेदनशील केंद्रांवर CCTV कॅमेरेDry Day लागूसार्वजनिक सुटी जाहीरअशी व्यवस्था करण्यात आली आहे.उद्याचा दिवस, उद्याची दिशाउद्या होणारे मतदान केवळ महापालिकांचा कारभार ठरवणार नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय दिशा निश्चित करणारे ठरणार आहे. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून, दुपारपर्यंत निकालांचे चित्र स्पष्ट होईल.


[…] […]
[…] […]