मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी “जिंकू किंवा लढू” हे या आठवड्याचे साप्ताहिक कार्य असेल असे जाहीर केले. आणि या साप्ताहिक कार्याच्या अंतर्गत उपकार्य सदस्यांना देण्यात येणार आहेत असे देखील सांगितले. “माझे मडके भरी” हे पहिले उपकार्य अक्षय आणि विशालमध्ये झालेल्या भांडणामुळे रद्द करण्यात आले. आणि बिग बॉस यांनी सदस्यांना ताकीद देखील दिली अश्याप्रकारच्या कृत्याचा ते निषेध करतात. आज नवा दिवस… बघूया आज बिग बॉस सदस्यांना कोणता नवा टास्क देणार. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घोषित केले आहे “घरातील फर्निचर पुढील आदेशापर्यंत वापरता येणार नाही”. आणि त्यामुळे घरामध्ये जरा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
हा आदेश येताच सदस्य एकावर एक मजेदार वाक्य करण्यास सुरुवात केली. गायत्री आणि तृप्ती देसाई यांनी वाक्य टाकायला सुरुवात केली. तृप्ती म्हणाल्या हारे हारे हारे… तर गायत्री म्हणाली ‘जे वापरणार बेड त्यावर तृप्तीताई म्हणाल्या आमची डायरेक्ट पडणार रेड” आता सदस्यांना हे फर्निचर कसे मिळणार ? कुठला नवा टास्क बिग बॉस यांना देणार ? बघूया आजच्या भागामध्ये.
या उलट दुसरीकडे स्नेहा, सुरेखा कुडची, दादुस, तृप्तीताईंचा एका वेगळा स्वतंत्र गृप तयार झालेला दिसतो आहे. हा गट म्हणजे घरातला C गृप. तृप्ती ताई म्हणाल्या C फॉर क्लिअर. A च्या आणि B च्या बाजूने नसलेला गृप. तर आज याच गृपमध्ये चर्चा रंगणार आहे ज्यामध्ये स्नेहा यांना सांगताना दिसणार आहे मीरा मला सांगत होती त्या पेंटमध्ये पाणी टाकुया. आता तो ऑइल पेंट त्यात पाणी कसं मिक्स होणार. आणि तिचं नाही ऐकला तर तिचा तिळपापड होतो. आणि त्यांच्यासोबत देखील तेच झालं तिचं. आणि ती स्वत:चे नियम बनवते हे खरं आहे.”
बघूया आज बिग बॉस मराठीच्या काय काय होतं ? तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा.कलर्स मराठीवर.