५०० रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणी महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक

0

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायप्रोफाइल पाच जणांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहेत.विशेष म्हणजे यात एक महिला आरोपी डॉक्टर आहे.संशयित आरोपींकडून एक-दोन नव्हे तर चक्क २९१ नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जिल्ह्यात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.संशयित पाचशे रुपयांच्या आणि एकूण १ लाख ४५ हजार रुपये किंमत असलेल्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात होते. याची कुणकुण लागताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना हाती लागलेल्या माहितीनुसार त्यांनी दोन संशयितावर पाळत ठेवली. त्यानंतर लासगावचे मोहन बाबुराव पाटील, डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ (रा. बोराडे हॉस्पिटलजवळ, लासलगाव) आणि विठ्ठल नाबरिया (रा. कृषीनगर, कोटमगाव रोड, लासलगाव) यांची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांचा प्लॅन ऐकुण पोलीसही आश्चर्यचकित झाले.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे,स.पो.उ.नि. राजेंद्र अहिरे, हवालदार बाळु सांगळे, पोलीस नाईक कैलास महाजन, योगेश शिंदे, संदिप शिंदे, पोका प्रदिप आजगे, गणेश बागुल, कैलास मानकर, सागर आरोटे देविदास पानसरे, महिला पोलिस शिपाई मनीषा शिंदे यांच्या पथकाने येवला रोड विंचुर येथे सापळा रचुन मोहन पाटील, प्रतिभा घायाळ, विठ्ठल नावरीया यांना बनावट ५०० रुपयाच्या २९१ नोटा देण्यासाठी आलेले रविंद्र हिरामण राऊत व विनोद मोहनभाई पटेल हे त्यांचेकडील कार क्रमांक एमएच ०३ सीएच ३७६२ मध्ये आले असता पंचासमक्ष छापा टाकुन त्यांचेकडुन ५०० रुपयाच्या २९१ बनावट नोटा व ४ लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली.

या संबंधितांविरोधात कॉन्स्टेबल प्रदिप आजगे यांनी लासलगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. संबंधितांविरोधात भादवि कलम ४८९ क. ई प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि रामकृष्ण सोनवणे हे करीत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.