मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडतं मोठा बॉम्ब फोडला आहे. नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबईतील एलबीएस रोड या मोक्याच्या ठिकाणी नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या कंपनीनं गुन्हेगाराकडून तीन एकर जमीन फक्त ३० लाख रुपयांत खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. शाह वली खान आणि सलीम पटेल या दाऊद यांच्या दोन निकटवर्तींयाकडून नवाब मलिक यांनी जागा विकत घेतली. या दोघांवनर १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी फक्त तीस लाख रुपयांत जागा विकत घेतली. याचे पुरावा शरद पवार यांच्याकडे पाठवणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं. आपले मंत्री काय करतात हे पवारांनाही कळू द्या, असे हि त्यांनी म्हंटले आहे.
फक्त ही एकच नसून अन्य चार मालमंत्तामध्ये अंडरवर्डचा सहभाग आहे. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध आहेत. त्यामुळेच प्राईम लोकेशनची जमीन मलिकांना स्वस्तात मिळाली. ही जमीन विकत घेताना स्टॅम्प ड्युटींमध्येही घोटाळे झाल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर नवाब मलिकही पत्रकार परिषद घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपानंतर आता मलिकांनी “आ राहा हूं मै…” असे ट्विट केले आहे. फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला नवाब मलिक काय प्रत्युत्तर देतायत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
This is not Salim-Javed story but a very serious matter of National importance: @Dev_Fadnavis #DevendraFadnavis https://t.co/aNcz4ofiqO
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 9, 2021