महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संपास नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा पाठिंबा

0

नाशिक -महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ, महाराष्ट्र शासन सेवेत घेण्यासह विविध मागण्यासह पुकारलेला संप सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताचा असून नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन या संपाला तसेच कर्मचाऱ्यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिल्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी कळविले आहे.

याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने नाशिक येथे एसटी कर्मचारी कृती समितीस आपले पाठिंबा पत्र दिले आहे. यावेळी अध्यक्ष राजेंद्र फड, सुभाष जांगडा, विशाल पाठक, दीपक ढिकले, सिद्धेश्वर साळुंके आदी उपस्थित होते.

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिलेल्या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. बाहेर मजुरी काम करणाऱ्या मजुरापेक्षा देखील एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार हा अतिशय कमी आहे. अनेक वर्षांपासून एसटी कर्मचारी सातत्याने विविध मागण्या मांडत असून अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने एसटी कर्मचारी अनेक अडचणींना तोंड देत आहेत. या सर्व अडचणीमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले आहे. ही राज्याच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे. अशा प्रकारची पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये आम्ही आपल्या सोबत आहोत असे म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, एसटी कर्मचारी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आपल्या योग्य मागण्यासाठी लढा लढत आहे. या लढ्यास सर्वांचा पाठिंबा आहे. सर्व संघटना व नागरिक आपल्या पाठीशी आहे. आपण मांडत असलेल्या मागण्या अतिशय रास्त असून सरकारला त्याचा विचार करावाच लागणार आहे. आपल्या या आंदोलनास आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करत असून आम्ही आपल्या सोबत असल्याचे त्यांनी पाठिंबा पत्रात म्हटले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.