मुंबई – आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण प्रेक्षकांना पहायला मिळतेय. मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि नुकतंच राया आणि कृष्णाचं लग्न झालं. गुरुजींच्या भाकिताप्रमाणे रायाची पहिली बायको हि अल्पायुषी ठरणार आहे. लग्न होताच वऱ्हाडाच्या बसला अपघात होतो पण त्यातून कृष्णा वाचते. दिवाळी मध्ये देखील कृष्णाचा पदर पेट घेतो तेव्हा देखील राया तिला वाचवतो. पण पुढे काही अघटित घडलं तर त्यातून कृष्णा सुखरूप बाहेर पडेल का? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरेल.
नुकतंच मालिकेत राया-कृष्णाचा दिवाळीतला पहिला पाडवा साजरा होतो. कृष्णा भाऊसाहेबांना लग्नानंतरही कारखान्यावर जाणार असल्याचे सांगते, भाऊसाहेब तिला होकार देतात. पहिला दिवाळसण म्हणून राया आणि कृष्णा घरच्यांबरोबर कुलदेवीच्या दर्शनाला जातात, पण येतना वाटेत राया-कृष्णाच्या गाडीला अपघात होतो. कृष्णा गाडीतून बाहेर फेकली जाते आणि रायाला कृष्णा दिसेनाशी होते. कृष्णाच्या जीवाला असलेला धोका टळेल कि गुरुजींचं भाकीत खरं ठरेल? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.