हरिअनंत,नाशिक
आपण मीन राशीला सुरू होणाऱ्या साडेसाती विषयी बोलतोय. शनीची साडेसाती सुरू होण्यापूर्वी सावधान होणे अतिशय महत्वाचे आहे.अर्थात साडेसाती सुरू होण्यापूर्वी शनी प्रत्येक राशीला सावधानतेचा इशारा देतो. ज्या राशीला साडेसाती सुरू होणार आहे, त्या त्या राशीला शनी साडेसाती सुरू होण्यापूर्वीचे काही महिने चुकीचे कर्म सुधारण्याची संधी देतो. संधी देऊनही साडेसाती सुरू होणाऱ्या राशीची व्यक्ती सुधारली नाही, आपल्याच मस्तीत, अहंकारात वावरली तर शनि ठरल्या प्रमाणे दंड ही देतो.
मीन ही रास जलतत्वाच्या अमलाखाली असलेली द्विस्वभावी स्रीभावी रास आहे. व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत द्वादश स्थानात मीन राशी अतिशय बलवान असते.द्वादश स्थानातील शनी जर शुभसंबंधी असेल तर अशा व्यक्तीला साडेसातीत विशेष त्रास होत नाही.लोकांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याकडे या मीन राशीच्या व्यक्तींचा कल असतो.
मीन राशीचा स्वामी ‘गुरू’ तो जर शुभ असेल, त्यातच शनी शुभ असेल तर या मीन राशीच्या व्यक्ती दूरदृष्टीच्या असतात. यांची वृत्ती आयाचित असते. पण जर शनी अशुभ,पीडित असेल तर या व्यक्तींना अपघाताचे भय असते.
अतिशय प्रिय,आवडत्या व्यक्तिमुळे या मीन राशीच्या व्यक्तींना जीवनात या ना त्या कारणाने फक्त दुःखाची प्राप्ती होते.जीवनोपभोग प्रयत्न करूनही घेता येत नाही. वयाच्या 47 ते पन्नासाव्या वर्षी धनहानी सहन करावी लागते .शनिचे वैशिष्ट्य असे शनी संपत्तीचा सुयोग्य विनियोग, दानशूरत्वसूचक हा शनी असतो.
शनी व्ययात असता त्याची दृष्टी जन्मपत्रिकेतील द्वितीय षष्ठ व नवम- स्थानावर असते. शनीच्या द्वितीय- स्थानावरील दृष्टीने दृष्टिदोष, वाचादोष निर्माण होतो; तर षष्ठवरील दृष्टीने व्यापार- व्यवसायात नुकसान, पराजय तुरुंगवास,अवनती, धननाश व कुटुंब ही फले शनीची नवमावरील दृष्टी सूचित करते.अर्थात आपलं हे बोलणं मीन राशीला लागणाऱ्या साडेसातीच्या निमित्ताने होत आहे मात्र
मीन राशीच नव्हे तर कोणत्याही जन्मपत्रिकेतीकेतील फलप्राप्ती विषयी विचार करताना त्या त्या ग्रहाचे भावकारकत्व, ग्रहांचे दिगबल, आणि त्या त्या स्थानाचा कारकग्रह व त्या ग्रहाच्या फलादेशस्थानांनुसार आणि इतरही काही बाबी म्हणजे त्यामध्ये ग्रह- युती वगैरेंचाही विचार करावा लागतो.
मीन राशीच्या जन्मपत्रिकेत शनी बरोबर जर चंद्राचा अशुभ योग असेल आणि शनी शत्रू राशीत असेल तर अशा व्यक्तींना शनीच्या साडेसातीचा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो.शनी जर शत्रू राशीत असला आणि शनीची महादशा किंवाअंतर्दशा सुरू असेल तर साडेसातीचा त्रास जास्त होतो.
साधारणतः ३५ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना शनीची साडेसाती ही अतिशय त्रासदायक ठरण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. मात्र मीन राशीचा स्वामी गुरू असल्या कारणाने मीन राशीच्या जन्मपत्रिकेत गुरू शुभ असेल तर या व्यक्तींना साडेसातीचा मुळीच त्रास जाणवत नाही. मात्र जन्मपत्रिकेतील गुरू अशुभ असेल, शनी बिघडलेला असेल तर निश्चितपणे साडेसातीत होणारा त्रास टाळण्यासाठी मीन राशींच्या व्यक्तींनी सावध व्हावे..
मीन राशीची व्यक्ती स्त्री असो की पुरुष यांच्या डोळ्यात एक तेजस्वी आत्मविश्वासी तेज असते. या तेजाचे महत्वपूर्ण कारण म्हणजे मीन राशीचा स्वामी गुरू बृहस्पती बृहस्पती देवांचे गुरू या गुरुचे तेज मीन राशीच्या व्यक्तीच्या डोळ्यात स्पष्ट दिसते.
मीन राशीचे चिन्ह हे दोन विरोधी मासे आहेत या माशाचे गुण स्पष्टपणे मीन राशीच्या व्यक्तीत स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतात.आपण निरीक्षणपूर्वक पाण्यातील माशाकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल. मासे पाण्यात अधिक वेळ स्थिर रहात नाही. त्यांचं इकडून- तिकडे धावणे सुरूच असते या माशाच्या गुणाप्रमाणेच मीन राशीच्या व्यक्तीचे विचार सतत बदलत असतात.
मीन राशीला लागणाऱ्या साडेसातीच्या होणारा परिणाम टाळण्यासाठी आपल्या जन्मपत्रिकेतील शनीची स्थिती जाणून घेणे महत्वाचे आहे.मीन राशिवर साडेसातीत होणारा परिणाम, स्वभाव, सुरक्षिता, सावधानता, आरोग्य, कुटुंब, मैत्री, व्यापार, साडेसातीच्या प्रथम अडीच वर्षात होणाऱ्या शनीचा व सध्या मिथुन व तुला राशीवर सुरू असलेल्या ढय्याचा परिणाम व उपाय विषयी पुढील भागात (क्रमशः) भाग -१४५
शुभम भवतु ...
मीन राशीच्या साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत