साहित्य संमेलनात ४ डिसेंबर च्या सायंकाळी रंगणार “आनंद यात्रा” सांस्कृतिक सोहळा
नाशिक मधील १५०-२०० कलावंतांचा भव्य दिव्य कार्यक्रम
नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक मध्ये होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनात दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नाशिक मधील १५०-२०० कलावंतांचा आनंद यात्रा (सांस्कृतिक सोहळा) हा कार्यक्रम सादर होणार आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रातिनिधिक अश्या दिवंगत साहित्यिकांच्य साहित्यावर हा कार्यक्रम आधारित आहे. या कार्यक्रमाचे लेखन प्राजक्त देशमुख यांनी केले असून मार्गदर्शन दत्ता पाटील यांचे आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन शिंदे व सहदिग्दर्शन विनोद राठोड हे करीत आहे.
आनंद यात्रा ह्या कार्यक्रमातून साहित्य परंपरा, शाहिरी परंपरा, नाट्यपरंपरा, सामाजिक परंपरा, कवी परंपरा, कथा-कादंबरी परंपरा, लोक परंपरा व चित्रपट परंपरा इत्यादी प्रकारचे विभाग केले असून नृत्य नाट्य व माहितीपटाच्या आधारे सदर कार्यक्रम सादर होणार आहे.अशी माहिती कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन शिंदे आणि सहदिग्दर्शक विनोद राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आनंदयात्रा कार्यक्रमा करीता तांत्रिक जबाबदारी
प्रकाश योजना विनोद राठोड
रंगभूषा-माणिक कानडे
वेशभूषा-अपूर्वा शौचे
संगीत संयोजन-आनंद ओक
ध्वनी संयोजन-रोहित सरोदे, जयंत ठोमरे
चित्रफीत संकलन लक्ष्मण कोकणे
समन्वयक- अभय ओझरकर, श्रीराम वाघमारे
त्याचप्रमाणे नाशिक मधील १५०-२०० नाटय व नृत्य कलावंत नाटक, कविता व काही प्रसंगाचा नाटय आविष्कार सादर करणार आहे. नृत्य कलावंताना अदिती पानसे, सुमुखी अथणी, कीर्ती भवाळकर व प्रदीप गोरडे ह्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.