महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी : पुढील २ दिवस पावसाची शक्यता
पुढील चार दिवस नाशिक जिल्ह्यातील वातावरण कसे असणार जाणून घ्या
मुंबई – मुंबईसह आज सकाळपासून महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ वातावरण पहायला मिळात आहे.दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव आणि लक्षद्वीप वर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये आज हवामानाने आपला रंग बदलला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक पालघर आणि पुण्यात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने (IMD) पुढील तीन दिवस या शहरांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. संततधार पावसामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे.
पावसामुळे पुणे आणि मुंबईतील रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. या शहरांव्यतिरिक्त नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राज्यात मंगळवारी दिवसभर पुण्यात कमाल ३५ अंश सेल्सिअस आणि किमान १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आज सकाळीच मुंबईतील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. त्याचप्रमाणे सायन, चेंबूर, कुर्ला,परेल,माहिम, दादर परिसरात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन हिवाळ्यात सकाळीच तुरळक पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.
पुढील चार दिवस नाशिक जिल्ह्यातील वातावरण कसे असणार जाणून घ्या
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
1 तारखेला सकाळी सकाळी लवकर नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भाग म्हणजेच सिन्नर,नाशिक,दिंडोरी,कळवण,चांदवड,सटाणा,सुरगणा इगतपुरी,त्र्यंबकेश्वर या भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पावसाचा जोर हळूहळू सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत पश्चिम भागाकडून पूर्वेकडे वाढत जाईल.
आज बुधवारी रात्री ९ ते ११ च्या दरम्यान सिन्नर,नाशिक,दिंडोरी,कळवण,चांदवड,देवळा,सटाणा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढेल.
गुरुवारी सकाळी नाशिक,सिन्नर,दिंडोरी,निफाड,चांदवड,येवला,नांदगाव,मालेगाव या तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
गुरुवारी सकाळी दहानंतर पावसाचा जोर कमी होऊ लागेल पण हलक्या स्वरुपात पाऊस पूर्वेकडील भागात दुपारपर्यंत सुरू राहील.
संध्याकाळी उशिरा सुरगणा,त्र्यंबकेश्वर,कळवण,सटाणा तालुक्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
नाशिक आणि दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात मात्र हलक्या स्वरुपात पाऊस होऊ शकतो.
रात्री उशिरा आणि शुक्रवारी सकाळी नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.
शुक्रवार सकाळी साडेनऊ ते दहा नंतर पावसाचा जोर कमी होईल
शुक्रवारी संध्याकाळी नाशिक आणि सिन्नर तालुक्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस होवु शकतो.
रविवार दिनांक ५ डिंसेबर पासून सहा ते आठ तास सूर्यप्रकाश पडू लागेल व थंडीत हळूहळू परत वाढ होण्यास सुरुवात होईल.
राहुल रमेश पाटील,सांगली.
मुख्य प्रबंधक,
हवामान साक्षरता लोकचळवळ.
मच्छिमारांनी पुढील पाच दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा
मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मच्छीमारांना पुढील ५ दिवस महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रात मासेमारीला न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय पुढील पाच दिवस समुद्रात ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दक्षिण-पूर्व अरबी समुद्र,मालदीव,लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती.तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती.येत्या २४ तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्र,मालदीव,लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता
पुढचे ३ दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
उद्या ओरेंज इशारा उत्तर भागात
IMD pic.twitter.com/uZL83iQa7I— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 30, 2021
Weather briefing on the ensuing rainfall activity over parts of Maharashtra during next 2 days : pic.twitter.com/6Xkuh8sKoc
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 30, 2021