उमंग महिला फाउंडेशनच्या वतीने कर्तबगार महिलांचा क्षितिजा महिला पुरस्काराने गौरव
उमंग महिला फाऊंडेशनने केलेल्या गौरवामुळे सामाजिक कामासाठी अधिक बळ मिळेल-सुनंदा पवार
नाशिक –उमंग महिला फाऊंडेशनने केलेल्या गौरवामुळे सामाजिक कामासाठीआम्हाला अधिक बळ मिळेल असे प्रतिपादन बारामती ऍग्रीकल्चरल च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले. त्या संजीवनी बँकवेट हॉल येथे क्षितिजा महिला सन्मान सोहळा कार्यक्रमात बोलत होत्या.या कार्यक्रमात सामाजिक ,राजकीय ,व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या विविध कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला.
“स्वरज्य रक्षक संभाजी राजे”मालिकेतील “राणू अक्का” यांची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी महांगडे प्रमुख पाहुण्या म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होत्या.उमंग महिला फौंडेशनच्या अध्यक्ष विद्या सागर आहेर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात क्षितिजा विशेष महिला जीवनगौरव पुरस्काराने महिलारत्न श्रीमती पुष्पाताई व्यंकटराव हिरे यांना तसेच क्षितिजा महिला जीवनगौरव पुरस्काराने बारामती अग्रीकच्लरलच्या विश्वस्त सुनंदा राजेंद्र पवार ,संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे ,मुंबई एजुकेशन ट्रस्टच्या विश्वस्त मीनाताई भूजबळ यांना प्रदान करण्यात आला. क्षितिजा महिला विशेष संन्मान,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड ,अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ आरती सिंग,सावि फौंडशेनच्या अध्यक्ष सविता व्होरा,सिल्वर एज युटोपीन च्या अध्यक्ष पिनल वानखेडे ,सामाजिक कार्यकर्त्या निना जाधव ,सुरेखा भालेराव ,डॉ शीतल गुप्ता आदि मान्यवरांना सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिक जिल्हात विविध क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणाऱ्या विविध कर्तबगार माहिलांना गौरविण्यात आले त्यात नूतन आहेर ,पूनम बिरारी ,सुवर्णा गांगोडे ,श्रुति देशमुख ,कविता पगार ,रूपाली बोरगुडे ,जयश्री गुजरे ,शेख फरजाणा अब्दुल आजिज ,संगीता फुके ,काजल खंडांगळे ,लता संधान ,मृणाल पाटील ,मोहिनी भुसे ,अश्मिका लाभडे ,भाग्यश्री तांबोळी ,धनश्री शेळके सौ नलिनी अहिरे ,वंदना सावंत ,अलका सावंत ,वैशाली पगार ,वैशाली अभळे ,वर्षा शिरोडे ,अर्चना सोनार ,मेघा धनगर ,कविता पाटील ,प्राजक्ता कुलकर्णी ,स्वाति झावरे ,अश्विनी भादाणे,हर्षदा सोनवने ,अपर्णा मरावर ,प्रीती गायकवाड आदि मान्यवराना ‘क्षितिजा महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्या साठी उमंग महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष विद्या सागर आहेर व आहेर फाउंडेशन चे संचालक सागर आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा वाघ यांनी केले तर आहेर फाउंडेशनचे संचालक सागर आहेर यांनी आभार प्रदर्शन केले.