कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागू 

दिवसाची जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू 

0

मुंबई- कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन निर्बंध लागू केले असून हे निर्बंध उद्या (९ जानेवारी) मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत.१५ फेब्रुवारी पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहे.प्रामुख्याने दिवसाची जमाव बंदी आणि रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या निर्बंधांमध्ये उद्याने ,मैदाने,स्वामिंगपूल,पर्यटन स्थळे ,जिम,स्पा हे पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हॉटेल रेस्टोरंट सह चित्रपटगृह ,नाट्यगृहात ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी दिली असून हॉटेल आणि रेस्टोरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.परंतु लसीचे २ डोस घेतला असेल त्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहेत.

खासगी कार्यालये, हॉटेल्स,सलून्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार आहेत. तर मॉल्स सकाळी १० ते रात्री ८ या वेळेतच सुरु ठेवता येतील. मुंबईतील लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.लग्न समारंभासाठी केवळ ५० लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. रात्री ११ ते सकाळी ५ वाजे  पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी असणार आहे. उद्या मध्यरात्रीपासून राज्यात हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. तर राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा ५ पेक्षा अधीक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

अशी आहे नवीन नियमावली

– ५० टक्के क्षमतेनं नाट्यगृह, सिनेमागृह सुरू राहणार
– राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद,  दिवसा ५० टक्के क्षमतेने सुरू रहणार
– बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांना ७२ तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक
– हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंतच सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
– हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार- विवाहाच्या बाबतीत, मग ते बंदिस्त जागेत असो किंवा मैदान  असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
–  सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा  खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.
– अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या २० व्यक्तींपुरती मर्यादित असेल
– सलून रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद. दिवसा ५०% क्षमते सुरू रहातील.
– शॉपिंग मॉल रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद. दिवसा ५०% क्षमतेने सुरू राहतील. तेही फक्तं ज्यांचे दोन्ही लसीकरण पुर्ण झालेत अशाच लोकांसाठी.
– कार्यालयं २४ तास सुरू ठेवून कर्मचाऱ्यांना विविध शिफ्टमध्ये कार्यरत करण्याची सूचना. जेणे करून कार्यालयात गर्दी होणार नाही.
– विमानतळ, रेल्वे, बसमधून फक्त ज्यांना तिकीट मिळाले आहे त्यांनाच प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे.

हे राहणार बंद

-स्विमिंग पूल, जिम, स्पॉ, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून बंद असतील
–  मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
– मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, किल्ले, वस्तूसंग्राहलय, स्नानिक पर्यंटन केंद्र पुर्णपणे बंद राहणार आहे.

अपडेट होते आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.